अधिकाऱ्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:07 AM2021-06-06T04:07:48+5:302021-06-06T04:07:48+5:30
सावरगाव : नरखेड तालुक्यातील पिपळा (केवळराम) येथील देवळी रिठी व खापा जनाबाई परिसरात गुरुवारी (दि. ३) वादळी पावसासह गारपीट ...
सावरगाव : नरखेड तालुक्यातील पिपळा (केवळराम) येथील देवळी रिठी व खापा जनाबाई परिसरात गुरुवारी (दि. ३) वादळी पावसासह गारपीट झाली. यात नागरिकांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले हाेते. दरम्यान, तहसीलदार डी. जी. जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
परिसरात गुरुवारी वादळी पावसासह गारपीट झाली. विजेच्या तारा अंगावर पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाला तसेच कडूनिंबाचे झाड झाेपडीवर काेसळल्याने दाेघे जखमी झाले. वादळामुळे पिपळा (केवळराम) येथील ३२ घरांवरील टिनपत्रे उडाले तर काही ठिकाणी घरांच्या भिंती काेसळून नुकसान झाले. या नुकसानीची तहसीलदारांनी पाहणी केली. यावेळी माजी जि. प. सदस्य देवका बाेडखे, पंचायत समिती सदस्य अरुण माेवाडे यांची उपस्थिती हाेती. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाईसाठी शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी तहसीलदार जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पिपळा (के.) येथील ग्रामपंचायत सरपंच रंजना चरपे, उपसरपंच रुमदेव हिंगणे, सदस्य वैशाली वैद्य, संगीता बारमासे, प्रमोद चापेकर, विलास चरपे, एन. आर. मिश्रा, तलाठी एच. बी. पाटणे, ग्रामसेविका एस. आर. राजनकर, शब्बीर अली, मोहन बोबडे, सोमेश्वर लेंभाडे उपस्थित हाेते.