अधिकाऱ्यांनी तपासली रेल्वेगाड्यातील भोजनाची गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:49 PM2019-09-25T22:49:37+5:302019-09-25T22:50:38+5:30

बुधवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील भोजनाची गुणवत्ता तपासण्यात आली.

Officials checked the quality of the food at the trains | अधिकाऱ्यांनी तपासली रेल्वेगाड्यातील भोजनाची गुणवत्ता

अधिकाऱ्यांनी तपासली रेल्वेगाड्यातील भोजनाची गुणवत्ता

Next
ठळक मुद्देस्वच्छ भोजन अभियान : पेंट्रीकारमधील कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेची पाहणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. पंधरवड्यात बुधवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील भोजनाची गुणवत्ता तपासण्यात आली.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छ भोजन अभियानांतर्गत पेंट्रीकार, बेस किचन, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, कॅन्टीनची बारकाईने पाहणी करून भोजनाची गुणवत्ता तपासली. आमलाचे सहायक विभागीय अभियंता वाय. एस. राघव यांनी १२६१६ जीटी एक्स्प्रेसची पाहणी केली. नागपूर रेल्वेस्थानकावर मुख्य आरोग्य निरीक्षक समीर चहांदे, मुख्य खानपान निरीक्षक रामबाबू, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे यांनी २२६९१ राजधानी एक्स्प्रेसच्या पेंट्रीकारचे निरीक्षण केले. यात खाद्यपदार्थांचे भाव, अग्निशमन यंत्र, डस्टबिन, व्हेंडरचे आरोग्य प्रमाणपत्र, पोलीस तपासणी प्रमाणपत्र आदींची पाहणी करण्यात आली. यावेळी स्टेशन संचालक दिनेश नागदेवे उपस्थित होते. रेल्वेगाड्यातील भोजनाबाबत प्रवाशांकडून माहिती जाणून घेण्यात आली. प्रवाशांकडून ते समाधानी असल्याबाबतचे फॉर्म भरून घेण्यात आले. त्यानंतर अजनी रेल्वे कॉलनीची पाहणी करण्यात आली.

प्रवाशांना खाद्यपदार्थांचे बिल देण्याची सूचना
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. रमणा यांनी सहायक वाणिज्य व्यवस्थापक जितेंद्र तिवारी आणि अधिकाऱ्यांसोबत आझादहिंद एक्स्प्रेसच्या पेंट्रीकारची पाहणी केली. पेंट्रीकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे हातमोजे, मास्क आहेत की नाही, त्यांचे डोके झाकलेले आहे काय, हातापायाची नखे कापली की नाही, ते वैद्यकीयदृष्ट्या निरोगी आहेत की नाही, त्यांचे ओळखपत्र आदी बाबी तपासण्यात आल्या. सहायक वाणिज्य व्यवस्थापक अनुराग सिंह यांनी प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ पुरविण्याच्या सूचना केल्या. यावेळी प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी प्रवाशांना प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले.

Web Title: Officials checked the quality of the food at the trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.