रस्त्यांची चाळण अन् अधिकारी म्हणतात फक्त ३,३६० खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:11 AM2021-08-19T04:11:49+5:302021-08-19T04:11:49+5:30

महापौरासंह पदाधिकारी गप्प: शहरातील रस्त्यांवरील ५४६५ खड्डे बुजविल्याचा दावा : लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील रस्त्यांची चाळण झाली ...

Officials say only 3,360 potholes! | रस्त्यांची चाळण अन् अधिकारी म्हणतात फक्त ३,३६० खड्डे!

रस्त्यांची चाळण अन् अधिकारी म्हणतात फक्त ३,३६० खड्डे!

Next

महापौरासंह पदाधिकारी गप्प: शहरातील रस्त्यांवरील ५४६५ खड्डे बुजविल्याचा दावा :

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच भागातील डांबरी रस्त्यावर लहानमोठे खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार शहरात फक्त ३,६६० खड्डे शिल्लक आहेत.

पावसाळा आला की शहरातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडतात. हा दरवर्षीचा अनुभव आहे. पावसाळ्याच्या दिवसात मनपाचा हॉटमिक्स प्लांट बंद राहात असल्याने जेट पॅचर व रोड इन्स्टा पॅचर मशीचा वापर करून खड्डे बुजवले जातात. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत रोड इन्स्टा पॅचरव्दारे शहरातील खड्डे बुजवण्याच्या १ कोटी ९८ लाख ९५ हजार ४९५ रुपयाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. ९०० रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे खड्डे बुजवले जाणार आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांच्या पत्रकार परिषदेत कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांनी दिली.

दुसरीकडे शहरातील अजनी रेल्वे पुलावरील खड्डे चार दिवसापूर्वी बुजवण्यात आले. यातील गिट्टी पुन्हा बाहेर पडली आहे. बोर्ड ऑफिस चौकाकडून संविधान चौकाकडे तसेच आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. अंबाझरी, एलएडी चौक, लेडीज क्लब चौक, सिव्हील लाईन्स, बेसा, आदिवासी गोवारी पुलाखालील रस्ता, झिंगाबाई टाकळी, देवनगर, खामला चौक यासह शहरातील बहुसंख्य रस्त्यांची स्थिती विदारक आहे.

...

५४६५ खड्डे बुजविल्याचा दावा खरा की खोटा?

हॉटमिक्स विभागाने शहरातील ५४६५ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शहरातील सर्वच डांबरी रस्त्यावर खड्डे कायम असल्याने विभागाचा दावा खरा की खोटा असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

.....

अपघाताचा धोका वाढला

पावसामुळे खड्डे पाण्याने भरले आहेत. ते लक्षात येत नसल्याने वाहनांचा अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. महापालिकेने ५४६५ खड्डे बुजविल्याचा दावा केला असला तरी, झालेल्या कामाबाबतही प्रश्नचिन्ह आहे. काही दिवसातच बुजवलेल्या खड्ड्यातील गिट्टी बाहेर पडते. परंतु कंत्राटदाराला जाब न विचारता कोट्यवधीचे बिल दिले जाते. मात्र यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनिषा धावडे यांच्यासह मनपातील पदाधिकारी गप्प असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

...

-शहरातील एकूण रस्त्यांची लांबी २,३१३.६५ किलोमीटर

-डांबरी रस्ते १,४९१.१९ किलोमीटर

-सिमेंटचे रस्ते ७०० किलोमीटर

- कच्चे रस्ते १५० किलोमीटर

Web Title: Officials say only 3,360 potholes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.