ओह चिंटूजी... दिल, चुरा के ले गये ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 06:28 PM2020-04-30T18:28:00+5:302020-04-30T18:31:24+5:30

साऱ्या जगताचे चिंटूजी उपाख्य ऋषी कपूर यांचे तसे नागपूरशी घनिष्ट संबंध. त्यांची सख्खी आत्या नागपुरातच होत्या आणि त्यांची एक आत्येबहिण नागपुरातच आहे.

Oh Chintuji ...you stole the heart .. Rishi Kapur | ओह चिंटूजी... दिल, चुरा के ले गये ..

ओह चिंटूजी... दिल, चुरा के ले गये ..

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरकरांना एकदाच भेटण्याचा अनुभवआत्तेबहीण अनुराधा खेटा यांनी दिला आठवणींना उजाळा


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि मत व्यक्त करण्यात तेवढीच फटकळ भूमिका बजावणाऱ्या साऱ्या जगताचे चिंटूजी उपाख्य ऋषी कपूर यांचे तसे नागपूरशी घनिष्ट संबंध. त्यांची सख्खी आत्या नागपुरातच होत्या आणि त्यांची एक आत्येबहिण नागपुरातच आहे. त्यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर, वडील राज कपूर, काका शशी, शम्मी व चूलत बंधू राजीव कपूर यांच्यासह कौटुंबिक कारणाने नागपूरला नेहमीच येणे-जाणे होते. मात्र, चिंटूजी त्या काळचे अत्याधिक व्यस्त अभिनेते आणि त्यांची फॅन फॉलोर्इंग बघता ते फारसे कुठे जात नसत. तरी एकदाच नागपुरात आले आणि चाहत्यांच्या गराड्यात ते आत्येबहिणीलाही वेळ देऊ शकले नव्हते. मात्र, त्यांच्या दर्शनाने नागपूरकरांनी ओह चिंटूजी... एक ही बार आये और दिल चुरा के ले गये अशी भावना व्यक्त केली होती.
ऋषी कपूर यांची आत्येबहिण अनुराधा खेटा नागपुरातील धंतोली भागात वास्तव्यास आहेत. ऋषी यांची आत्या ऊर्मिला यांचा विवाह नागपूरच्या चरणजितसिंग सियाल यांच्यासोबत झाला. ऊर्मिला यांना चार मुले आणि त्यातील तीन मुले दुसरीकडे वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी अनुराधा यांचा विवाह शहरातील प्रख्यात उद्योगपती घराणे खेटा कुटूंबीयातील लहान पुत्र प्रकाश खेटा यांच्याशी झाला. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आठवणींना उजाळा दिला तेव्हा त्यांनी साधारणत: २५-२६ वषार्पूर्वीच्या नागपूर भेटीचा उल्लेख केला. यशवंत स्टेडियममध्ये एका जाहीर कार्यक्रमासाठी चिंटूजी आले होते. त्यावेळी त्यांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. कार्यक्रम आटोपून कसे तरी त्यांनी आमच्याकडे येऊन थांबणेच पसंत केले. मात्र, घराच्या बाहेरही रसिकांची तुंबळ गर्दी उसळली. त्यामुळे, जास्त काळ थांबता आले नाही आणि काहीच तासाच्या भेटीनंतर त्यांना विमानाने परत फिरावे लागले होते. नागपूरला ती पहिली आणि अखेरची भेट ठरली होती, असे अनुधारा खेटा यांनी सांगितले.

अखेरची भेट गेल्याच वषी
ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्याच अनुषंगाने गेल्या वर्षी त्यांची भेट मुंबईत झाली होती. आजारातून उठल्यावर भेट होईल अशी इच्छा होती पण ईश्वराला ती मंजूर नसावी. निधनाचीच वार्ता कानावर पडल्याचे अनुराधा खेटा यांनी सांगितले.

कपूर घराण्याचे नागपूरशी विशेष कनेक्शन
चित्रपट क्षेत्रातील अत्याधिक प्रतिष्ठेचे घराणे म्हणून कपूर घराण्याचे नाव घेतले जाते. पृथ्वीराज कपूर यांच्यापासूनच चित्रपटाच्या वितरणाकरिता नागपुरात त्यांचे येणे-जाणे होत असे. पंचशील सिनेमाचे जवाहरलाल मुणोत यांचे नेहमी आर.के. स्टूडीओजला जाणे असे. त्यांच्या काळात राज कपूर यांचे दिवाना, सपनो का सौदागर वगैरे सिनेमांचे राईट्स पंचशिल सिनेमाकडेच होते. त्याच काळात ऋषी कपूर यांचीही भेट झाल्याचे जवाहरलाल मुणोत यांचे पुत्र प्रमोदकुमार मुणोत यांनी सांगितले.

इंंदूरच्या कार्यक्रमाचे संपूर्ण श्रेय मलाच दिले - किशन शर्मा
राजकपूर यांनी इंदूरच्या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. राम तेरी गंगा मैली या सिनेमाचा सिल्वर जुबली सोहळा होता. कार्यक्रम संपन्न झाल्यावर या कार्यक्रमाचे संपूर्ण श्रेय मला देऊन राज कपूर यांनी मला अनेक भेटवस्तू दिल्या होत्या. त्याच कार्यक्रमात ऋषी कपूर यांची भेट झाली होती. अतिशय निर्मळ स्वभावाचे होते, असा अनुभव आकाशवाणीचे माजी प्रसिद्ध निवेदन किशन शर्मा यांनी सांगितला.

ऋषी कपूर चॉकलेटी अभिनेता. नंतरच्या काळात त्यांनी गंभीर व खलभूमिका साकारूनही रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली. मात्र, त्यांचे वाद्यांशी अनोखे नाते जुळून आले. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळे वाद्य हाती घेतले व ते सर्व वाद्य त्यांना शोभून दिसत होती. हा एक आगळाच भाग ठरला. कर्तमध्ये गीटार, सरगममध्ये डफली, बासरी तर अनेक चित्रपटांमध्ये ते वेगवेगळ्या वाद्यांसोबत दिसले. ही सर्व वाद्ये हाताळण्याचा सहज अभिनय म्हणूनच की काय ही सर्व इन्स्ट्रुमेंट्स त्यांना शोभून दिसत होती. विशेष म्हणजे ते बालपणात दी नट्स नावाच्या बॅण्डशी जुळले होते आणि ड्रमसह इतर वाद्ये वाजविण्याचा त्यांना सराव होता. त्यांचे प्रेमरोग, बॉबी सागर ही रोमॅण्टिक सिनेमे आजही तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांची फिमेल फॅन फॉलोविंग त्या काळात इतकी होती की आजचे सुपरस्टार्सही लाजवून जातील. अनेक मुली त्या काळी त्यांच्यासाठी घर सोडून मुंबईला आलेल्या होत्या.

Web Title: Oh Chintuji ...you stole the heart .. Rishi Kapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.