अबब! १०० ट्रिलियन डॉलरची नोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 08:37 PM2018-05-18T20:37:48+5:302018-05-18T20:38:51+5:30

चलनी नोट जास्तीतजास्त किती रुपयांची असायला पाहिजे असा प्रश्न विचारल्यास कुणीही ट्रिलियन (एक लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचणार नाही. अशावेळी एखाद्या देशाने तब्बल १०० ट्रिलियन डॉलरची नोट चलनात आणली होती असे कुणी सांगितल्यास त्यावरही विश्वास बसणे कठीणच. परंतु, दुसऱ्या क्रमांकाची गोष्ट खरी असेल तर. होय, हे आपल्यासाठी आश्चर्यकारक असले तरी सत्य आहे. ही नोट रमण विज्ञान केंद्रातील वस्तू संग्रह प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. ती नोट पाहून प्रत्येक अभ्यागत अवाक होत आहे.

Ohh! $ 100 trillion note | अबब! १०० ट्रिलियन डॉलरची नोट

अबब! १०० ट्रिलियन डॉलरची नोट

Next
ठळक मुद्देअभ्यागत अवाक : वस्तू संग्रहालय प्रदर्शनाने दिला संस्मरणीय अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चलनी नोट जास्तीतजास्त किती रुपयांची असायला पाहिजे असा प्रश्न विचारल्यास कुणीही ट्रिलियन (एक लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचणार नाही. अशावेळी एखाद्या देशाने तब्बल १०० ट्रिलियन डॉलरची नोट चलनात आणली होती असे कुणी सांगितल्यास त्यावरही विश्वास बसणे कठीणच. परंतु, दुसऱ्या क्रमांकाची गोष्ट खरी असेल तर. होय, हे आपल्यासाठी आश्चर्यकारक असले तरी सत्य आहे. ही नोट रमण विज्ञान केंद्रातील वस्तू संग्रह प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. ती नोट पाहून प्रत्येक अभ्यागत अवाक होत आहे.
विदेशी चलन गोळा करण्याचा छंद जोपासणारे विजय पटेल यांनी ही नोट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्याकडे एक पैशापासून ते तब्बल १०० ट्रिलियन डॉलरपर्यंतच्या नोटा आहेत. त्यांनी सर्व नोटा प्रदर्शनात ठेवल्या आहेत. १०० ट्रिलियन डॉलरच्या नोटा झिम्बाब्वे सरकारने चलनात आणल्या होत्या. कालांतराने त्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यापैकी एक नोट पटेल यांनी अथक परिश्रम घेऊन प्राप्त केली आहे. ती नोट पटेल यांच्या संग्रहाचा मुकुटमणी आहे. याशिवाय प्रदर्शनामध्ये विविध दुर्मीळ, नावीन्यपूर्ण व कलात्मक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन अभ्यागतांना संस्मरणीय अनुभव प्रदान करीत आहे. पूजा काळबेंडे यांनी हिमालयातील पक्ष्यांची छायाचित्रे, अनिल मेश्राम यांनी भारतीय चित्रपटाच्या १०० वर्षानिमित्त प्रकाशित डाक तिकिटे, अनन्या गोंडाणे यांनी दुर्मीळ वस्तू, रूप कनोजिया यांनी जगातील पहिली प्लास्टिक नाणी, फ त्तुजी सोनवाने यांनी विविध देशांच्या चलनी नोटा, जयंत तांदुळकर यांनी काष्टकला व बॉटल कला, लक्ष्मण लोखंडे यांनी सिने अभिनेते-अभिनेत्रींच्या स्वाक्षºया, इब्राहिम खान यांनी वजनमापे, रामसिंग ठाकूर यांनी जुनी नाणी व पत्रिका, नितीन बक्षी यांनी अडकित्ते, पोस्ट कार्ड, घड्याळी, जयंत खेडकर यांनी क्युब्स व ओरिगामी कला, सुधाकर सोनार यांनी १८५४ पासूनच्या टपाल तिकिटा, अनिता सारडे यांनी ३३० ठिकाणची माती, नीलिमा मून यांनी साबण कला, अनुष्का ठाकरे यांनी शंख, राजेश चौधरी यांनी चलनी नोटा व नाणी, गंगाधर अडसर यांनी चलनी नाणी, सोहम अपराजित यांनी ओरिगामी कला, दिलीप डहाके यांनी विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्षºया तर, कोमल खेडकर यांनी खेळण्याच्या कार्सचा संग्रह प्रदर्शनात सादर केला आहे.
सोमवारपर्यंत चालेल प्रदर्शन
जागतिक संग्रहालय दिवसानिमित्त रमण विज्ञान केंद्र व छंद वैभव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे प्रदर्शन २१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान, सकाळी ११.३० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत प्रदर्शनाला भेट देता येईल. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी. आर. अंधारे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी रमण विज्ञान केंद्राचे संचालक एन. रामदास अय्यर व छंद वैभव संस्थेचे अध्यक्ष जयंत खेडकर उपस्थित होते. 

Web Title: Ohh! $ 100 trillion note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.