बाप रे ! दोन महिन्यात रेल्वेत ८० हजार फुकटे प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 09:25 PM2018-06-13T21:25:05+5:302018-06-13T21:25:38+5:30
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. परंतु अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून विनातिकीट प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात अशा ८० हजार ६३२ फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ९२ लाख ९४ हजार रुपये दंड वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. परंतु अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून विनातिकीट प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात अशा ८० हजार ६३२ फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ९२ लाख ९४ हजार रुपये दंड वसूल केला.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र यांच्या नेतृत्वात आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक एच. के. बेहरा यांच्या निरीक्षणाखाली विना तिकीट प्रवाशांविरुद्ध अभियान राबविले. यात १ एप्रिल ते ३१ मे महिन्यापर्यंत विनातिकीट आणि सामानाची नोंद न केलेल्या ८० हजार ६३२ प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मे महिन्यात ३६ हजार ६३४ फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ३४ लाख ५३ हजार दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षी याच कालावधीत २९ हजार १३२ फुकट्या प्रवाशांकडून १ कोटी १२ लाख ६४ हजार दंड वसूल करण्यात आला होता. १ एप्रिल ते मे २०१८ मध्ये विनातिकीट प्रवास करणाºया १६ हजार ३५४ फुकट्या प्रवाशांकडून ९७ लाख ७२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तर मे महिन्यात ८ हजार ३९० प्रवाशांकडून ५१ लाख २९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. १ एप्रिल ते मे २०१८ पर्यंत ७५ हजार ८४७ अनियमित तिकीट धारक आणि सामानाची नोंद न करणाºया प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ कोटी ८९ लाख ९५ हजार दंड वसूल करण्यात आला. मासिक तिकीट धारकांनी आरक्षित डब्यातून प्रवास न करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. विनातिकीट प्रवास करणे हा दंडात्मक आणि सामाजिक गुन्हा असून प्रवाशांनी योग्य दराचे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.