अबब ! नागपुरात १०३ कोटींची थकीत पाणीपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:53 PM2019-01-08T22:53:01+5:302019-01-08T22:53:56+5:30

उपराजधानीत थकीत पाणीपट्टीच्या रकमेचा आकडा शंभर कोटींहून अधिक झाला आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार शहरातील १ लाख ९० हजारांहून अधिक ग्राहकांकडे थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.

Ohh! Water bill of Rs 103 crore outstanding in Nagpur | अबब ! नागपुरात १०३ कोटींची थकीत पाणीपट्टी

अबब ! नागपुरात १०३ कोटींची थकीत पाणीपट्टी

Next
ठळक मुद्दे१ लाख ९० हजारांहून अधिक ग्राहकांकडे थकबाकी : २३ महिन्यांत ८ हजार जोडण्या कापल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत थकीत पाणीपट्टीच्या रकमेचा आकडा शंभर कोटींहून अधिक झाला आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार शहरातील १ लाख ९० हजारांहून अधिक ग्राहकांकडे थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर या माहितीच्या अधिकारात नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत मनपाने किती ग्राहकांना पाण्याचे देयक पाठविले, किती ग्राहकांनी देयक भरले, थकबाकीची रक्कम नेमकी किती होती, तसेच किती ग्राहकांच्या जोडण्या कापण्यात आल्या इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. जलप्रदाय विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत २६ लाख ४४ हजार १०१ पाणी देयक जारी करण्यात आले. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी शहरात पाण्याचे ३ लाख ३६ हजार ७५१ ग्राहक होते. यापैकी १ लाख ९० हजार ५८३ ग्राहकांकडे कमी-अधिक प्रमाणात देयकांची रक्कम थकीत आहे. थकबाकीची एकूण रक्कम ही १०३ कोटी ८८ लाख ४ हजार ४३५ इतकी आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनातर्फे नेमके काय प्रयत्न करण्यात येत आहेत हा प्रश्नच आहे.
केवळ ४ टक्के थकबाकीदारांवर कारवाई
दरम्यान, या २३ महिन्यांच्या कालावधीत थकबाकीदार असलेल्यांपैकी केवळ ४ टक्के ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. ८ हजार ३७८ ग्राहकांच्या नळ जोडण्या कापण्यात आल्या. या कालावधीत ३५ हजार ७१० नवीन जोडण्यादेखील देण्यात आल्या. तर नादुरुस्त मीटरसंदर्भात केवळ १८८ तक्रारी प्राप्त झाल्या.

Web Title: Ohh! Water bill of Rs 103 crore outstanding in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.