तेल कंपन्या करताहेत नागरिकांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:53 AM2018-05-31T01:53:56+5:302018-05-31T01:54:07+5:30

देशातील तेल कंपन्यांनी १५ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत निरंतर वाढ केल्यानंतर १६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे १ पैसे आणि १७ व्या दिवशी पेट्रोलमध्ये ३ पैसे आणि डिझेलमध्ये २ पैशांची घट केली आहे. यामुळे देशात असंतोष पसरला आहे. पण तेल कंपन्यांवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. तेल कंपन्या १ वा ३ पैशांनी दर कमी करून नागरिकांची थट्टा करीत आहेत.

Oil companies are doing mockery of people | तेल कंपन्या करताहेत नागरिकांची थट्टा

तेल कंपन्या करताहेत नागरिकांची थट्टा

Next
ठळक मुद्देपेट्रोल व डिझेलमध्ये केवळ दोन आणि तीन पैशांचा दिलासा


लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : देशातील तेल कंपन्यांनी १५ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत निरंतर वाढ केल्यानंतर १६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे १ पैसे आणि १७ व्या दिवशी पेट्रोलमध्ये ३ पैसे आणि डिझेलमध्ये २ पैशांची घट केली आहे. यामुळे देशात असंतोष पसरला आहे. पण तेल कंपन्यांवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. तेल कंपन्या १ वा ३ पैशांनी दर कमी करून नागरिकांची थट्टा करीत आहेत.
नागपुरात हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल गुरुवारी प्रति लिटर ८६.७१ रुपये व डिझेल ७४.३२ रुपये आणि भारत पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल ८६.६४ रुपये आणि डिझेल ७४.२४ रुपयांत उपलब्ध राहील. हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपावर मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे अनुक्रमे दर ८६.७४ व ७४.३४ रुपये होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतारामुळे गेल्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पेट्रोलमध्ये ३.७२ रुपये आणि डिझेलच्या किमतीत ३.५६ रुपये वाढ झाली. या दरवाढीमुळे दैनंदिन उपयोगाच्या वस्तू महाग झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसात मालवाहतुकीत ८ ते १० टक्के वाढ झाली आहे. बाजारात भाजीपाला आणि फळांच्या किमतीत वाढ झाली आहे.

Web Title: Oil companies are doing mockery of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.