गॅरेजमधून ऑईल, मशीन साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:08 AM2021-05-06T04:08:58+5:302021-05-06T04:08:58+5:30
माैदा : अज्ञात चाेरट्याने लाॅकडाऊनमुळे बंद असलेल्या गॅरेजमधून ६०० लिटर ऑईल व इतर साहित्य असा एकूण ४९ हजार रुपये ...
माैदा : अज्ञात चाेरट्याने लाॅकडाऊनमुळे बंद असलेल्या गॅरेजमधून ६०० लिटर ऑईल व इतर साहित्य असा एकूण ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना माैदा शहरातील न्यू अण्णा गॅरेज येथे मंगळवारी (दि.४) सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
अशाेक कुमार काेपुल्ली (३४, रा. श्रीकृष्णनगर, माैदा) यांचे न्यू अण्णा गॅरेज असून, तेथे ट्रॅक्टर व जेसीबी दुरुस्तीची कामे केली जातात. लाॅकडाऊनमुळे त्यांचे गॅरेज बंद आहे. गॅरेजबाहेर दुरुस्तीसाठी आलेली वाहने व इतर साहित्य ठेवले असल्याने ते दरराेज गॅरेजची पाहणी करतात. दरम्यान, मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते गॅरेजकडे आले असता, गॅरेजच्या बाहेर ठेवलेले प्रत्येकी २०० लिटर खराब झालेले ऑईलचे तीन ड्रम किंमत २४ हजार रुपये तसेच २५ हजार रुपये किमतीचे दुरुस्तीसाठी आलेेले अलाईनमेंट सेट करण्याची मशीन असा एकूण ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरट्याने लंपास केल्याचे आढळून आले. याबाबत अशाेक काेपुल्ली यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार चांगदेव कुथे करीत आहेत.