जुन्या पुस्तकांच्या दुकानांना ग्राहकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:34+5:302020-12-14T04:26:34+5:30

पाच टक्क्यावर आला व्यवसाय : व्यावसायिकांमध्ये आली निराशा नागपूर : थंडीच्या दिवसात पूर्वी जुन्या पुस्तकांची खरेदी वाढत होती. परंतु ...

Old bookstores await customers | जुन्या पुस्तकांच्या दुकानांना ग्राहकांची प्रतीक्षा

जुन्या पुस्तकांच्या दुकानांना ग्राहकांची प्रतीक्षा

Next

पाच टक्क्यावर आला व्यवसाय : व्यावसायिकांमध्ये आली निराशा

नागपूर : थंडीच्या दिवसात पूर्वी जुन्या पुस्तकांची खरेदी वाढत होती. परंतु या वर्षी थंडीच्या दिवसात जुनी पुस्तके विकणाऱ्यांच्या नशिबी निराशा आली आहे. अनलॉकनंतर त्यांना दुकाने सुरु करण्याची परवानगी तर मिळाली, परंतु ग्राहक या दुकानांकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. शाळा, महाविद्यालये बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. सीताबर्डी परिसरात झिरो माईलपासून पोलीस ठाण्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुंना जुन्या पुस्तकांची जवळपास ५० दुकाने आहेत. यातील १५ दुकानेच सध्या उघडत आहेत. रविवारी येथील काही जुन्या पुस्तकाच्या व्यावसायिकांनी सांगितले की, या सिझनमध्ये ग्राहकांची संख्या चांगली असते. परंतु आता खूप कमी ग्राहक दुकानाकडे फिरकत आहेत. केवळ ५ टक्के व्यवसायच होत आहे. काही जणांनी सांगितले की आम्ही अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतो. परंतु इतके खराब दिवस कधीच पाहिले नसल्याचे त्यांनी सांगितले.

.............

Web Title: Old bookstores await customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.