‘ओमायक्रॉन’ वेशीवर; तुम्ही लस घेतली का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 06:06 PM2021-12-05T18:06:29+5:302021-12-06T12:49:52+5:30
जिल्ह्यात १३ टक्के लोकांनी पहिला डोसच घेतला नाही तर, ५२ टक्के लोक अद्यापही संपूर्ण लसीकरणांपासून दूर आहेत. यामुळे संभाव्य तिसरी लाट आल्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे.
-लोकमत इन्फोग्राफिक्स
नागपूर : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ने राज्यात प्रवेश केला आहे. शिवाय, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेल्या ‘डेल्टा व्हायरस’चे रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. कोरोनाची तीव्रता व मृत्यूदर कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्त्वाची आहे. असे असताना नागपूर जिल्ह्यात १३ टक्के लोकांनी पहिला डोसच घेतला नाही तर, ५२ टक्के लोक अद्यापही संपूर्ण लसीकरणांपासून दूर आहेत. यामुळे संभाव्य तिसरी लाट आल्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे.
-आतापर्यंत जिल्ह्यात झालेले लसीकरण
पहिला डोस : दोन्ही डोस
हेल्थकेअर वर्कर : ६७,८५४ : ६०,२४३
फ्रंटलाईन वर्कर :१,३३,९९९ : १,१६,८७७
१८ ते ४४ वयोगट : १७,४०,१६२ : ७,६२,४२४
४५ व त्या पेक्षा जास्त : १३,४२,२९७ : ८,६५,८१८
- कळमेश्वर तालुक्यात सर्वाधिक लसीकरण
नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये सर्वाधिक लसीकरण कळमेश्वर तालुक्यात झाले. या जिल्ह्यात ९५,८६२ लोकांनी पहिला डोस घेतला. याचे प्रमाण ९६.८२ टक्के आहे. तर, ४६,६४७ लोकांनी दुसरा डोस घेतला. याचे प्रमाण ४७.११ टक्के आहे.
- सर्वात कमी लसीकरण रामटेक तालुक्यात
सर्वात कमी लसीकरण रामटेक तालुक्यात झाले आहे. रामटेक तालुक्यात २८ नोव्हेंबरपर्यंत ८६,८२७ लोकांनी पहिला डोस घेतला. याचे प्रमाण ७४.४८ टक्के आहे. तर ३६,६६८ लोकांनी दुसरा डोस घेतला, याचे प्रमाण ३१.४६ टक्के आहे.
- २८ नोव्हेंबरपासून झालेले लसीकरण
२८ नोव्हेंबर : १६,९४६
२९ नोव्हेंबर : ३०,०४७
३० नोव्हेंबर : ४२,४०२
१ डिसेंबर : २०,३९८
२ डिसेंबर : १४,६८९
३ डिसेंबर : १३,५०१
४ डिसेंबर : १५,२४९
- तालुकानिहाय १०० टक्के लसीकरण गावांची संख्या
भिवापूर : ३ गावे
कामठी : १४ गावे
काटोल : ६ गावे
कुही : १ गाव
मौदा : १४ गावे
नागपूर : २४ गावे
नरखेड : ६ गावे
पारशिवनी : १ गाव
रामटेक : ६ गावे
सावनेर : ८ गावे
उमरेड : २१ गावे
-लसीकरणाची गती वाढविणार
‘मिशन कवचकुंडल’, ‘मिशन युवा स्वास्थ्य’, रात्रीचे लसीकरण व ‘हर घर दस्तक’ लसीकरण मोहिमेतून जास्तीत जास्त लोक लसवंत करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात नागपूर विभागातील लसीकरणाची स्थिती समाधानकारक आहे. पहिला डोस घेणाऱ्यामध्ये नागपूर राज्यात आठव्या स्थानी (८८.३४ टक्के) आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये नागपूर राज्यात सहाव्या स्थानी (४८.८८ टक्के) आहे.
-डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर