नागपुरातील कुख्यात कालूच्या हत्येतील एक आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:33 PM2018-11-15T22:33:17+5:302018-11-15T22:34:44+5:30

बुधवारी दुपारी जरीपटक्यातील गुंड कालू ऊर्फ संदीप विलास गजभिये (वय २८) याच्या हत्याकांडातील आरोपी शुभम ऊर्फ घुबड वासनिक (वय २५, रा. विद्यानगर) याला जरीपटका पोलिसांनी अटक केली. त्याचे साथीदार मात्र फरार आहेत.

One accused in the murder of the notorious goon Kalu of Nagpur arrested | नागपुरातील कुख्यात कालूच्या हत्येतील एक आरोपी गजाआड

नागपुरातील कुख्यात कालूच्या हत्येतील एक आरोपी गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देदोघे फरार : जुगार अड्ड्यावरील पैशाचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी दुपारी जरीपटक्यातील गुंड कालू ऊर्फ संदीप विलास गजभिये (वय २८) याच्या हत्याकांडातील आरोपी शुभम ऊर्फ घुबड वासनिक (वय २५, रा. विद्यानगर) याला जरीपटका पोलिसांनी अटक केली. त्याचे साथीदार मात्र फरार आहेत.
कालू तसेच त्याच्या भावाविरुद्ध मारहाण करणे, धमकी देणे, जुगार व मटका चालविण्यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. मायानगर परिसरात ललित कला भवनच्या मागे त्याने जुगार व मटका अड्डा सुरू केला होता. त्या अड्ड्यावर पैशाच्या देण्या-घेण्यावरून साथीदारासोबत त्याचा वाद झाला. चार दिवसापूर्वीच लखन वाढवेच्या भावासोबत पुन्हा कालूचा वाद झाला होता. तेव्हापासून आरोपी कालूचा गेम करण्याच्या तयारीत होते. बुधवारी दुपारी ३.३० च्या दरम्यान कालू त्याच्या जुगार अड्ड्यावर सुमित ऊर्फ बिट्टू दुर्योधन टेंभूर्णे, मनोज गोविंद सिंग तसेच तन्मय जाधवसोबत पत्ते खेळत असताना आरोपी शुभम ऊर्फ घुबड वासनिक, लखन वाढवे, बिरजू वाढवे यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. तो जीवाच्या भीतीने पळू लगला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला बाजूच्या मैदानात पकडले आणि धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला. कालूच्या मदतीला धावलेल्या सुमितलाही आरोपींनी गंभीर जखमी केले. सुधीर ऊर्फ चापल विलास गजभिये (वय २६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एपीआय व्ही. एस. बादोले यांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी धावपळ करून शुभमला अटक केली. त्याच्या फरार साथीदाराचा शोध घेतला जात आहे.

आरोपी तीन की चार?
कालूच्या हत्येला २४ तासांपेक्षा जास्त अवधी झाला. मात्र, या हत्याकांडात आरोपी तीन आहे की चार याबाबत पोलिसांचा संभ्रम आहे. हल्ल्याच्या वेळी असलेल्या कालूच्या मित्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात चार आरोपी आहेत. पोलिसांनी बुधवारी रात्री शुभम आणि आणखी एकाला ताब्यात घेतले होते. मात्र, तो हत्याकांडात सहभागी आहे की नाही, याबाबत ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याला अटक करण्याचे पोलिसांनी टाळले आहे.

Web Title: One accused in the murder of the notorious goon Kalu of Nagpur arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.