दरवर्षी सव्वा लाख मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 04:21 PM2020-11-21T16:21:13+5:302020-11-21T16:31:02+5:30
Nagpur News Prakash Ambedkar दरवर्षी 1 लाख 25 हजार मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित असून यासाठी भाजप आणि काँग्रेस आघाडी हे दोघेही दोषी आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरवर्षी 1 लाख 25 हजार मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित असून यासाठी भाजप आणि काँग्रेस आघाडी हे दोघेही दोषी आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, 2006 साली शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी सरकारला एक कायदा करायला भाग पाडले. तो कायदा म्हणजे खाजगी शिक्षण संस्थामध्ये आरक्षणाचा कायदा होय. यात st, sc, obc, vj nt आदींना विविध जागांचे आरक्षण देण्यात आले. हा कायदा एक वर्ष बरोबर चालला. नंतर सरकारने एक अधिनियम पास करून या कायद्यात 50 टक्के कपात केली. त्यामुळे दरवर्षी 1 लाख 25 हजार मागासवर्गीय विद्यार्थी उचच शिक्षणापासून वंचित राहत आहेत. हे देशाचे मोठे नुकसान आहे.
या विषयावर इतक्या वर्षात शिक्षक पदवीधर मतदार संघातून निवडून गेलेल्या एकाही आमदाराने आवाज उचलला नाही, त्यामुळे आम्ही शिक्षक व पदवीधरची निवडणूक लढवीत आहोत, असे त्यांनी स्पस्ट केले.
मराठा आंदोलकांचा सरकारने विश्वासघात केला
सरकारने मराठा आंदोलकांचा विश्वासघात केल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले, सरकारने न्यायालयाच्या अधीन राहून जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना फ्रिशिप व स्कॉलरशिप द्यायला हवी होती पण सरकार करायला तयार नाही