उमरेड आगाराला दरदिवशी दीड लाखाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:39+5:302021-02-10T04:08:39+5:30

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : गोरगरीब, मध्यमवर्गीयांची ‘लालपरी’ एसटी कोरोना काळातील अतिशय खडतर प्रवासातही आता हळूहळू सर्वच ...

One and a half lakh hits to Umred Agara every day | उमरेड आगाराला दरदिवशी दीड लाखाचा फटका

उमरेड आगाराला दरदिवशी दीड लाखाचा फटका

Next

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : गोरगरीब, मध्यमवर्गीयांची ‘लालपरी’ एसटी कोरोना काळातील अतिशय खडतर प्रवासातही आता हळूहळू सर्वच मार्गावर धावत आहे. राज्य परिवहन महामंडळ यासाठी नियोजन आखत असले तरी असंख्य आगारांना दरदिवशी लाखो रुपयाचा तोटा सोसावा लागत आहे. त्यात उमरेड आगारालाही दरदिवशी दीड लाख रुपयाच्या आसपास फटका बसत असल्याची बाब समोर येत आहे. त्यातही सातत्याने इंधनाच्या दरात होणारी वाढ परिवहन महामंडळाची कंबरडेच मोडणारी ठरत आहे, हे येथे विशेष.

उमरेड आगारातून एकूण ४६ एसटीपैकी सध्या वेगवेगळ्या मार्गावर ४३ एसटी धावत आहेत. दररोज २८८ बसफेऱ्या सुरू असून, १६,६३४.३ किलोमीटरचा प्रवास या बसफेऱ्यांचा होतो. एकूणच संपूर्ण बसफेऱ्यांच्या माध्यमातून दिवसाकाठी सध्या ३ लाख ४० हजार रुपयाचे उत्पन्न उमरेड आगाराच्या तिजोरीत जमा होत असते. एकूण खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बघता उमरेड आगाराला दरदिवशी ४ लाख ८० रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. असे होताना दिसत नसल्याने दिवसाकाठी १ लाख ४० हजार रुपयाचा फटका आगाराला सोसावा लागत आहे.

...

उपाहारगृह सुरू होणार

सुमारे दाेन-तीन वर्षांपासून उमरेड आगारातील उपाहारगृह बंद आहे. यापूर्वीचे कंत्राट संपल्यानंतर आता तब्बल दोन वर्षानंतर याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या असून, निविदेची प्रक्रिया आटोपताच येत्या काही महिन्यात उपाहारगृह पूर्ववत सुरू होण्याचे संकेत आगार व्यवस्थापक संजय डफरे यांनी दिले.

....

विद्यार्थी पासेसचा गुंता

अलीकडे आता शाळा नियमित सुरू झाल्याचे चित्र आहे. गावखेड्यातील बहुसंख्य विद्यार्थी शहरात एसटीने शिक्षणासाठी येतात. असे असले तरी तालुक्यातील सिर्सी आणि बेला या दोन बसथांब्यांवर विद्यार्थी पास सवलत वितरणाचे काम बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय होते. या गंभीर विषयावर संजय डफरे यांच्याकडे विचारणा केली असता, वाहतूक नियंत्रकांच्या चार जागा रिक्त असल्याने ही समस्या उद्भवल्याचे त्यांनी सांगितले. सिर्सी आणि बेला येथील विद्यार्थी पासेस उमरेड आगारातून उपलब्ध असल्याचे ते बोलले. आम्हाला फारच त्रास होत असून, आमच्या गावातील बसथांब्यावरूनच पासेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.

Web Title: One and a half lakh hits to Umred Agara every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.