विदर्भात दीड लाख रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 10:59 PM2020-10-15T22:59:58+5:302020-10-15T23:01:50+5:30
Corona Nagpur News गुरुवारी १३९० रुग्ण व ४२ मृत्यूची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १७३२२७ तर मृतांची संख्या ४७०५ झाली आहे. १५०५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंगणीक कमी होत चालला आहे. गुरुवारी १३९० रुग्ण व ४२ मृत्यूची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १७३२२७ तर मृतांची संख्या ४७०५ झाली आहे. १५०५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे, अमरावती विभागाच्या तुलनेत मात्र नागपूर विभागात रुग्णसंख्येची गती अधिक आहे. विशेषत: चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात रुग्णसंख्येत खूप जास्त घट झालेली नाही.
नागपूर जिल्ह्यात आज ५८८ नवे रुग्ण व २३ मृत्यू झाले. रुग्णसंख्या ८९०८७ तर मृतांची संख्या २८९२ वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १९९ व दोन रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १२९४५ तर मृतांची संख्या १९५ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात १२० रुग्ण आढळून आले असून दोन रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाची संख्या ८२७३ तर मृतांची संख्या ११० झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ९१ रुग्ण व दोन मृत्यूची भर पडली. रुग्णसंख्या ७१९२ व १७९ रुग्णांचे मृत्यू झाले. अमरावती जिल्ह्यात ७२ पॉझिटिव्ह व चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १५१९० झाली असून मृतांची संख्या ३४३ वर पोहचली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७० रुग्ण व दोन रुग्णाचे मृत्यू झाले. वाशिम जिल्ह्यात ५२ रुग्ण आढळून आले. वर्धा जिल्ह्यात ६८ रुग्ण व दोन मृत्यूची नोंद झाली. यवमाळ जिल्ह्यात ६१ रुग्ण व दोन मृत्यू झाले. बुलढाणा जिल्ह्यात ३७ रुग्ण व दोन मृत्यू तर अकोला जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे, ३२ रुग्ण व एका मृत्यूची भर पडली.