महिलेला दीड लाखाने गंडविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:41 AM2021-02-05T04:41:25+5:302021-02-05T04:41:25+5:30
जयश्री ज्ञानदेव सावंत (२८, रा. केटीपीएस काॅलनी, नागपूर) यांचे बँकेत खाते असून, त्या क्रेडिट कार्ड वापरतात. त्यांना काही दिवसांपूर्वी ...
जयश्री ज्ञानदेव सावंत (२८, रा. केटीपीएस काॅलनी, नागपूर) यांचे बँकेत खाते असून, त्या क्रेडिट कार्ड वापरतात. त्यांना काही दिवसांपूर्वी निनावी फाेन आला. आपण बीएसएनएलच्या कार्यालयातून अधिकारी बाेलत असल्याची बतावणी अनाेळखी व्यक्तीने केली आणि जयश्री यांना केवायसी करण्याची सूचना केली. त्यांनी हाेकार देताच त्या व्यक्तीने जयश्री यांच्या माेबाइलवर लिंक पाठवून प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली.
त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून जयश्री यांनी त्या लिंकवर जावून आवश्यक माहिती नमूद केली. त्यात त्यांच्या क्रेडिट कार्डच्या गाेपनीय माहितीचाही समावेश हाेता. त्या व्यक्तीने गाेपनीय माहितीचा वापर करीत त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ५५ हजार ७१० रुपयांची परस्पर उचल केली. रकमेची उचल करताच त्यांच्या माेबाइलवर मॅसेज आला. त्यांनी याबाबत बँकेत चाैकशी करताच या व्यवहारात त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी काेराडी (ता. कामठी) पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि ४१९, ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम सहकलम ६६ (क), (ड) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार राजेश खंडारकर करीत आहेत.