नागपुरातील जयताळा भागात दररोज दीड हजार जणांना मिळतोय मोफत डबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 06:36 PM2020-04-24T18:36:35+5:302020-04-24T18:37:06+5:30

जयताळा भागातील बहुसंख्य मागास असलेल्या एकात्मतानगर भागातील गरज लक्षात घेऊन पारेंद्र पटले व त्यांच्या चमुने भोजनदाचा पर्याय अवलंबवला आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टसिंग ठेवून हा उपक्रम गेल्या आठ दिवसांपासून राबविण्यात येत असून, तब्बल पंधराशे जणांची व्यवस्था येथून करण्यात आली आहे.

One and a half thousand people are getting free food every day in Jayatala area of Nagpur | नागपुरातील जयताळा भागात दररोज दीड हजार जणांना मिळतोय मोफत डबा

नागपुरातील जयताळा भागात दररोज दीड हजार जणांना मिळतोय मोफत डबा

googlenewsNext
ठळक मुद्देपटले मित्र परिवार करीत आहे जेवणाची व्यवस्था



लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जयताळा भागातील बहुसंख्य मागास असलेल्या एकात्मतानगर भागातील गरज लक्षात घेऊन पारेंद्र पटले व त्यांच्या चमुने भोजनदाचा पर्याय अवलंबवला आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टसिंग ठेवून हा उपक्रम गेल्या आठ दिवसांपासून राबविण्यात येत असून, तब्बल पंधराशे जणांची व्यवस्था येथून करण्यात आली आहे. या भागातील बहुतांश लोकांकडे रेशनकार्ड असलेतरी अनेकांकडे अद्यापही रेशनकार्ड नाहीत. शिवाय काही लोक झोपडीत राहात आहेत त्यांच्या जेवणाची कुठेही व्यवस्था झालेली नाही. अशा लोकांचा पटले मित्र परिवाराकडून शोध घेण्यात आला. त्यांची नोंद झाली असून अशाच गरजूंची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रारंभीच्या काळात अन्न धान्याच्या किट या भागातील नागरिकांना वितरित करण्यात आल्या. ज्या उपक्रमाचा सुमारे आठशे ते हजार कुटुंबाला फायदा झाला आहे. या उपक्रमाला जयताळा बाजारातील होलसेल भाजी मार्केटचा मोठा फायदा झाला. मित्रपरिवारातील सदस्य नियमित पंधराशे जणांचा भाजी व भाताची व्यवस्था करण्यात येते. या उपक्रमात पारेंद्र पटले यांच्यासोबत भाजपा युवा मोचार्चे संपूर्ण कार्यकर्ते राहुल क्षिरसागर, अंकित वानखेडे, राकेश रोकडे, सागर आगलावे , धीरज चंदनकर, आकाश शाहू, शुभम डोबाडे,  रहांगडाले, आकाश आकाश तुरकर, आशिष फुंडे, अमित भारम, मयूर सायरे, आकाश घोडे, विकास मस्के, गणेश, शुभम पारधी, नरेंद्र चौधरी, आशिष तुरकर, जुतू पाल व कार्यकर्ते जुळले आहेत. लॉकडाऊन संपतपर्यंत हा उपक्रम असाच सुरू ठेवणार असल्याचा संकल्प पारेंद्र पटले यांनी केला आहे.

Web Title: One and a half thousand people are getting free food every day in Jayatala area of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.