कोरोनाकाळातील दीड वर्षात ११ लाख नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:02+5:302021-07-02T04:08:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मार्च २०२० पासून कोरोनामुळे विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत तर निवडक वाहनचालकांनाच ...

In the one and a half years of the Corona period, 11 lakh citizens broke traffic rules | कोरोनाकाळातील दीड वर्षात ११ लाख नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम

कोरोनाकाळातील दीड वर्षात ११ लाख नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मार्च २०२० पासून कोरोनामुळे विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत तर निवडक वाहनचालकांनाच बाहेर निघण्याची परवानगी होती. असे असतानादेखील कोरोनाकाळातील दीड वर्षात वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे तब्बल ११ लाखांहून अधिक नागरिकांनी वाहतुकीचे नियम मोडले. नागपूर शहरातील लोकसंख्या लक्षात घेता एक तृतीयांशहून अधिक लोकांवर कारवाई झाली आहे. मागील काही वर्षांतील कारवाईपेक्षा हा आकडा मोठा आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. नागपुरात १ जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ या कालावधीत किती जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, त्यांना किती दंड ठोठावण्यात आला, परवाना नसताना किती लोक वाहन चालवत होते, तसेच किती हेल्मेट न घालता सापडले इत्यादी प्रश्न उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ या कालावधीत वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी ११ लाख ७ हजार ९९१ नागरिकांवर ई-चलान कारवाई करण्यात आली. त्यातील ४ लाख ८९ हजार ७४० नागरिकांनी दंड भरलेला नसून ही रक्कम २० कोटी ४४ लाख ७६ हजार ३०० रुपये इतकी आहे.

दीड वर्षाच्या कालावधीत नागपूर शहरात रिंग रोड व विविध जंक्शन्सवर १ हजार १२३ अपघात झाले व यात २९१ नागरिकांचा बळी गेला. यातील ३६ बळी रिंग रोडवरील होते.

हेल्मेट न घालणे २.४८ लाख लोकांना भोवले

हेल्मेट न घालता दुचाकी चालविल्याप्रकरणी २ लाख ४८ हजार ९९९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून ३ कोटी ५५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सिग्नल तोडल्याप्रकरणी ४९ हजार ३९८ लोकांवर कारवाई झाली व त्यांच्याकडून ७५ लाख ६२ हजारांचा दंड घेण्यात आला. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या ६९ हजार २६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांना १ कोटी २० लाख ७० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला.

गुन्हा - कारवाई - दंड (रुपयांमध्ये)

हेल्मेट न घालणे - २,४८,९९९ - ३,५५,९४,५००

सिग्नल तोडणे - ४९,३९८ - ७५,६२,२००

अतिवेगाने गाडी चालविणे - १३,९३९ - १९,९४,०००

राँगसाइड गाडी चालविणे - ५,०३२ - २०,१९,०००

गाडी चालविताना मोबाइल वापरणे - ६९,२६२ - १,२०,७०,६००

शांतता क्षेत्रात हॉर्न वाजविणे - २९९ - १,१५,०००

परवाना नसताना वाहन चालविणे - ८४,३७९ - १,२०,२०,०००

Web Title: In the one and a half years of the Corona period, 11 lakh citizens broke traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.