वीजबिलाच्या वादातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:06+5:302021-03-13T04:16:06+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित झाला आणि कुटुंबात वादाला ताेंड फुटले. याच वादातून तिघांनी ...

One beaten up over electricity bill dispute | वीजबिलाच्या वादातून एकास मारहाण

वीजबिलाच्या वादातून एकास मारहाण

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित झाला आणि कुटुंबात वादाला ताेंड फुटले. याच वादातून तिघांनी एकास बेदम मारहाण केली असून, तिघांना अटक करण्यात आली. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील झिलबाेडी येथे गुरुवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

अमित गावंडे (४०) असे जखमीचे नाव असून, अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये काशिनाथ भयाराम गावंडे, सारंग काशिनाथ गावंडे व रणजीत काशिनाथ गावंडे या तिघांचा समावेश आहे. हे सर्व जण नातेवाईक असून, झिलबाेडी, ता. भिवापूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घरातील वीजपुरवठ्याचे एकच मीटर आहे. त्यांनी विजेचे थकीत बिल न भरल्याने त्यांच्याकडील वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

अमितची पत्नी रेखा यांनी तुम्ही बिल भरले नाही म्हणून आमच्या घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे म्हणताच भांडणाला सुरुवात झाली. त्या तिघांनीही अमितचा गळा आवळून काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. या प्रकरणी रेखा गावंडे यांच्या तक्रारीवरून भिवापूर पाेलिसांनी भादंवि ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक भस्मे करीत आहेत.

Web Title: One beaten up over electricity bill dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.