अभिजित वंजारी यांच्या आमदार निधीतून रुग्णालयांना एक कोटीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:10+5:302021-05-01T04:07:10+5:30
नागपूर : कोरोनाची स्थिती गंभीर झाली असून विविध सुविधा उभारण्यासाठी विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांच्या आमदार निधीतून एक ...
नागपूर : कोरोनाची स्थिती गंभीर झाली असून विविध सुविधा उभारण्यासाठी विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांच्या आमदार निधीतून एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विविध वैद्यकीय संस्था व रुग्णालयांना आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२१-२१ अंतर्गत हा निधी वाटप करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे कोविड-१९ अंतर्गत ऑक्सिजन प्लान्टच्या उभारणीकरिता ४० लाख रुपये, वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयाला नवीन सुसज्ज रुग्णवाहिका खरेदीकरिता २० लाख रुपये तसेच भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयाला नवीन सुसज्ज रुग्णवाहिका खरेदीकरिता २० लाख रुपये, ग्रामीण रुग्णालय, बुटीबोरी, जि. नागपूर येथे कोविड-१९ रुग्णांच्या सेवेकरिता वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्याकरिता १० लाख रुपये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय/इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय/ग्रामीण रुग्णालयाकरिता १० लाख रुपयाचा निधी वाटप करण्यात आला.