स्मार्ट सिटीला एक कोटीचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 10:22 PM2021-07-28T22:22:15+5:302021-07-28T22:22:47+5:30
केंद्र सरकारच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालय व स्मार्ट सिटीज मिशनतर्फे राबविण्यात आलेल्या "इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज" अंतर्गत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडला या चॅलेंज अंतर्गत एक कोटीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालय व स्मार्ट सिटीज मिशनतर्फे राबविण्यात आलेल्या "इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज" अंतर्गत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडला या चॅलेंज अंतर्गत एक कोटीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्रीय गृह निर्माण व शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी चॅलेंजमध्ये निवड करण्यात आलेल्या ११ शहरांची घोषणा केली. यात नागपूरचाही समावेश आहे. यावेळी स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर आणि सह सचिव कुणाल कुमार, आई.टी.डी.पी.च्या साऊथ ईस्ट रशिया प्रोग्राम प्रमुख श्रेया गाडेपल्ली उपस्थित होते. ११ शहरांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे.
नागपूरमध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यात नागरिकांना सहभागी करून घेतले होते. मागील वर्षभरात स्मार्ट सिटीतर्फे टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात नागपुरात लहान - लहान उपाय करून सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले. सुधारणासंबंधी १५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हॅंडल बार सर्व्हे करण्यात आले. सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. तसेच नागपूर शहरासाठी १८ किमीचा डेडिकेटेड बायसिकल लेन तयार करण्यात येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी दिली.