एक निशाण, एक संविधान : ‘जम्मू काश्मीर’च्या निर्णयाचे उपराजधानीत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 09:57 PM2019-08-05T21:57:29+5:302019-08-05T22:01:07+5:30

जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० हटवून राज्याचे विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या पावलाचे उपराजधानीत स्वागत करण्यात आले. देशात ‘एक निशाण, एक संविधान’ हीच प्रणाली हवी, असे म्हणत विविध संघटनांतर्फे अक्षरश: आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष यांच्यासह विविध संघटनांकडून शहरात जोरदार जल्लोष करण्यात आला. याशिवाय विविध सरकारी, खासगी कार्यालये, कट्टे, महाविद्यालय यांच्यासह ‘सोशल मिडीया’वरदेखील हाच चर्चेचा विषय होता.

One flag, one Constitution: Welcome to the Jammu and Kashmir Decision in the Sub-Capital | एक निशाण, एक संविधान : ‘जम्मू काश्मीर’च्या निर्णयाचे उपराजधानीत स्वागत

एक निशाण, एक संविधान : ‘जम्मू काश्मीर’च्या निर्णयाचे उपराजधानीत स्वागत

Next
ठळक मुद्देसंघ, भाजपासह विविध संघटनांकडून आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० हटवून राज्याचे विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या पावलाचे उपराजधानीत स्वागत करण्यात आले. देशात ‘एक निशाण, एक संविधान’ हीच प्रणाली हवी, असे म्हणत विविध संघटनांतर्फे अक्षरश: आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष यांच्यासह विविध संघटनांकडून शहरात जोरदार जल्लोष करण्यात आला. याशिवाय विविध सरकारी, खासगी कार्यालये, कट्टे, महाविद्यालय यांच्यासह ‘सोशल मिडीया’वरदेखील हाच चर्चेचा विषय होता.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने नागपुरकडेदेखील अनेकांचे लक्ष लागले होते. सोमवारी जम्मू-काश्मीरबाबत सरकार महत्त्वाचे पाऊल उचलणार असल्याची चर्चा होतीच. सकाळपासूनच लोकांचे टीव्हीकडे लक्ष लागले होते. राज्यसभेत यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयक मांडताच अनेकांना विश्वासच बसला नाही. कलम ३७० च्या तरतुदींमध्ये सुधारणा तसेच जम्मू-काश्मीर राज्याचे केंद्रशासीत प्रदेशांत विभाजन झाल्यानंतर तर अनेकांनी तातडीने ‘सोशल मिडीया’वरुन आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली.
दुपारी १ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व्हेरायटी चौकात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, मिठाईचे वाटप, ढोलताशांचा गजर असे चित्र होते. अनेक लोकप्रतिनिधीदेखील ताल धरुन नाचताना दिसून आले. याशिवाय दिवसभरात विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिवसेना यांच्यातर्फेदेखील जल्लोष साजरा करण्यात आला.
‘सोशल मिडीया’त केवळ ‘शहा-मोदी’च
दरम्यान, ‘सोशल मिडीया’मध्ये तर एकाहून एक धम्माल ‘पोस्ट’ येण्यास सुरुवात झाली. काही जणांनी तर चक्क जम्मू-काश्मीरमध्ये ‘प्लॉट’ खरेदीसंदर्भातदेखील ‘मिम्स’ तयार केले. बहुतांश ‘पोस्ट’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी निगडीतच मजकूर दिसून येत होता. अनेकांनी या दोघांचे अभिनंदनदेखील केले.
‘व्हेरायटी’ चौकात जोरदार जल्लोष 

संघ तसेच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी व्हेरायटी चौकात जोरदार जल्लोष केला. महापौर नंदा जिचकार व माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी तर फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पाऊस येत असतानादेखील आनंदाला उधाण आले होते. कार्यकर्त्यांनी तिरंगा उंचावून श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाची आठवण केली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहकार्यवाह रविंद्र बोकारे, आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.सुधाकर देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण दटके, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, जयप्रकाश गुप्ता, महिला मोर्चा अध्यक्ष कीर्तिदा अजमेरा, कल्पना पांडे, चेतना टांक, किशोर पलांदुरकर, विक्की कुकरेजा, बंडू राऊत, सुबोध आचार्य, चंदन गोस्वामी, मनोरमा जयस्वाल, मनीषा काशीकर इत्यादी उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषदेतर्फे निर्णयाचे स्वागत
विश्व हिंदू परिषद, बजरंग दलानेदेखील या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष साजरा केला. बडकस चौकात दुपारी चारच्या सुमारास कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्रित आले होते. यावेळी ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मिठाईचेदेखील वाटप करण्यात आले. यावेळी विहिंपचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे, कोषाध्यक्ष हरीश हरकरे, संगठन मंत्री अरुण नेटके, महानगर अध्यक्ष सुदर्शन शेंडे, उपाध्यक्ष अमित बेमबी, भैयाजी चौबे, मंत्री प्रशांत तितरे, बजरंग दल सह-संयोजक विशाल पुंज, संकेत आंबेकर, लखन कुरील, प्रांत महिला उपाध्यक्ष ममता चिंचवड़कर, महिला प्रमुख शुभदा देवगड़े, दुर्गा वाहिनीच्या मयूरी मखे, इति नारवाड़े, मंगलताई गढ़वे, चंद्रशेखर चौरसिया, राजेश कोल्हे, देवकुमार पाराशर, सुभाष मुंजे, राम पलांदुरकर, जय विश्वकर्मा, कमलेश गुप्ता, मंगेश बढ़े इत्यादी उपस्थित होते.
शिवसैनिकांनी वाटली मिठाई
शिवसेनेतर्फे पारडी नाका चौकात जल्लोष करण्यात आला. जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी विधानसभा संघटक यशवंत रहांगडाले, उपजिल्हा प्रमुख रविनीश पांडे, शहर प्रमुख राजेश तुमसरे, शहर समन्वयक नितीन तिवारी, मुन्ना तिवारी, अजय दलाल, योगेश न्यायखोर, छगन सोनवणे, यश जैन, कृष्णा चावके, प्रवीण डिकोंडवार, अमित रात्रे, शुभम जैन, धीरज फंदी, अमोल हुड, सुरेश टाले, रोशन निर्मलकर, अरविंद राजपूत, अमोल ठाकरे, खुशाल मेश्राम, रूपेश गजभिए, नीलेश सतीबावने, मोहन विश्वकर्मा इत्यादी उपस्थित होते.
पूर्व नागपुरात ‘आझादी दिवस’
सतरंजीपुरा चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूर्व नागपुरातील भाजपा कार्यकर्त्यांनी चक्क ‘आझादी दिवस’च साजरा केला. आ.कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी तिरंगा फडकाविला. यावेळी मंडळ अध्यक्ष महेंद्र राऊत, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेवक चेतना टांक, मनीषा कोठे, मनीषा अतकरे, अभिरुची राजगिरे, संजय महाजन, मनीषा धावडे, कांता रारोकर, दीपक वाडीभस्मे, समिता चकोले, वंदना भुरे, भाजपा व्यापारी मोर्चाचे अध्यक्ष संजय वाधवानी, देवेंद्र काटोलकर, बाला विटालकर, सचिन करारे, निशा भोयर, सीमा ढोमणे, संतोष लढ्ढा, सैयद हुसैन अली, ताहेर अली, मुरलीधर वडे, अनिल कोड़ापे, राजेश संगेवार, सुधीर श्रीवास्तव, शेख एजाज, नंदा येवले, राकेश गांधी इत्यादी उपस्थित होते.

Web Title: One flag, one Constitution: Welcome to the Jammu and Kashmir Decision in the Sub-Capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.