एक लाख घेतले, प्रॉडक्ट दिलेच नाही; सायबर गुन्हेगाराची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 08:24 PM2021-08-02T20:24:20+5:302021-08-02T20:24:42+5:30

Nagpur News आमचे प्रॉडक्ट ऑनलाइन विकत घ्या. काही दिवसांनंतर तुम्ही दिलेली रक्कमही परत घ्या, अशी बतावणी करून एका तरुणाचे एक लाख रुपये सायबर गुन्हेगाराने हडपले. रक्कम परत करण्याचे सोडा, जे प्रॉडक्ट खरेदी केले, तेसुद्धा आरोपीने दिले नाही.

One lakh was taken, no product was given; The beating of a cyber criminal | एक लाख घेतले, प्रॉडक्ट दिलेच नाही; सायबर गुन्हेगाराची थाप

एक लाख घेतले, प्रॉडक्ट दिलेच नाही; सायबर गुन्हेगाराची थाप

googlenewsNext
ठळक मुद्दे रक्कम परत करण्याचे दाखविले होते आमिष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - आमचे प्रॉडक्ट ऑनलाइन विकत घ्या. काही दिवसांनंतर तुम्ही दिलेली रक्कमही परत घ्या, अशी बतावणी करून एका तरुणाचे एक लाख रुपये सायबर गुन्हेगाराने हडपले. रक्कम परत करण्याचे सोडा, जे प्रॉडक्ट खरेदी केले, तेसुद्धा आरोपीने दिले नाही.

२७ जूनला घडलेल्या या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर बजाजनगर पोलिसांनी रविवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.

अमित मधुकर अहिरे (वय २७) हे लक्ष्मीनगरात राहतात. २७ जूनला त्यांनी ॲमेझोन ८४ या वेबसाइटवर वेगवेगळे प्रॉडक्ट विक्रीसाठी उपलब्ध दिसले. एका लिंकवर आढळलेल्या मोबाइल नंबरवर अमितने संपर्क केला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने अमितला आगळीवेगळी ऑफर सांगितली. तुम्हाला आमच्या साइटवर जे प्रॉडक्ट आवडले, ते खरेदी करा. काही दिवसांनंतर तुम्ही खरेदीसाठी भरलेली संपूर्ण रक्कम परत मिळेल, अशी थाप मारली. आरोपीने त्यासाठी अमितला एक बँक खाते देऊन त्यात १ लाख २ हजार रुपये जमा करण्यास बाध्य केले. ही रक्कम जमा केल्यानंतर अमितने बुक केलेले प्रॉडक्ट आरोपीने पाठविलेच नाही. नंतर, आरोपीने संपर्कच तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अमितने बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: One lakh was taken, no product was given; The beating of a cyber criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.