२५० शिक्षकांपैकी एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:29 AM2020-11-22T09:29:10+5:302020-11-22T09:29:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उद्या सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. संसर्गाचा धोका लक्षात घेता शिक्षकांची कोरोना चाचणी केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उद्या सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. संसर्गाचा धोका लक्षात घेता शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. महापालिकेच्या २५० शिक्षकांची चाचणी करण्यात आली. यात एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही दिलासादायक बाब आहे. परंतु विद्यार्थ्यांची चाचणी कशी करणार, हा गंभीर प्रश्न आहे.
पहिल्या टप्प्यात इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. नागपूर शहरात ९ वी ते १२ वी पर्यंत ५९३ शाळा आहेत. या शाळांच्या ६,२५२ शिक्षकांची आर.टी.पी.सी.आर चाचणी (कोरोना चाचणी) मनपाच्या ५० कोविड -१९ चाचणी केन्द्रात आणि सहा वॉक इन सेंटरमध्ये नि:शुल्क केली जात आहे. यात शनिवारपर्यंत मनपा शाळांतील २५० शिक्षकांची चाचणी करण्यात आली, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.