नागपुरात बीपीच्या गोळ्यांनी घेतला एकाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 12:16 AM2020-05-10T00:16:05+5:302020-05-10T00:18:16+5:30
प्रमाणाबाहेर बीपीच्या गोळ्या घेतल्यामुळे एमआयडीसीतील एका व्यक्तीचा जीव गेला. सुधीर तुळशीराम मेश्राम (वय ४५) असे मृताचे नाव आहे.मेश्राम एकात्मता नगरात राहत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रमाणाबाहेर बीपीच्या गोळ्या घेतल्यामुळे एमआयडीसीतील एका व्यक्तीचा जीव गेला. सुधीर तुळशीराम मेश्राम (वय ४५) असे मृताचे नाव आहे.मेश्राम एकात्मता नगरात राहत होते. त्यांना बीपीचा त्रास होता. ५ मे रोजी त्यांनी प्रमाणाबाहेर बीपीच्या गोळ्या घेतल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी उपचार करून त्यांना घरी पाठविले. मात्र शुक्रवारी त्यांची पुन्हा प्रकृती बिघडली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मी सुधीर मेश्राम (वय ३५) यांनी दिलेल्या सूचनेवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
तरुणीसह पाच जणांचा अकस्मात मृत्यू
शहरातील एका तरुणीसह पाच जणांचा अकस्मात मृत्यू झाला. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.
जरीपटक्यातील सिंधी कॉलनीत राहणारी प्रीती सुरेश दयारामानी (वय २५) हिची शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक प्रकृती खालावली. तिला जनता हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
जरीपटक्यातीलच इंदोरा १२ खोलीजवळ जाणारे दिनेश वासनिक (वय ५२) यांची शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडली. त्यांना इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
गिट्टीखदानमधील योगेंद्र नगरात राहणारे मोहम्मद अनवर जावेद अक्रम खान (वय ४५) यांची शुक्रवारी दुपारी प्रकृती खराब झाली आणि त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
शुक्रवारी पाचपावलीतील शकिला बानू सलमान खान (वय२४) यांच्या पोटात दुखणे सुरू झाले त्यांना उपचारासाठी मेयोत नेले असता रात्री ९ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शांतिनगरातील उषा जीवनलाल सचदेव ( वय ५९) यांची प्रकृती शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बिघडली. त्यांना उपचारासाठी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या सर्व प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.