७५ कॉपीबहाद्दरावर बोर्ड करणार एकतर्फी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:25 PM2019-05-10T22:25:38+5:302019-05-10T22:26:37+5:30

राज्य शिक्षा मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडण्यासाठी अनुशासनात्मक समितीपुढे हजर राहण्याची तीन वेळा संधी दिली होती. ७५ विद्यार्थी समितीपुढे हजर झाले नाही. त्यामुळे बोर्ड या विद्यार्थ्यांच्या विरोधात एकतर्फी कारवाई करणार आहे. यासंदर्भात समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

One-sided action will be taken by board to 75coppy cheater | ७५ कॉपीबहाद्दरावर बोर्ड करणार एकतर्फी कारवाई

७५ कॉपीबहाद्दरावर बोर्ड करणार एकतर्फी कारवाई

Next
ठळक मुद्देतीन वेळा संधी देऊनही बाजू मांडण्यास कुणीच पोहचले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षा मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडण्यासाठी अनुशासनात्मक समितीपुढे हजर राहण्याची तीन वेळा संधी दिली होती. ७५ विद्यार्थी समितीपुढे हजर झाले नाही. त्यामुळे बोर्ड या विद्यार्थ्यांच्या विरोधात एकतर्फी कारवाई करणार आहे. यासंदर्भात समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.
सूत्रांच्या मते परीक्षे दरम्यान कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्यांना समितीपुढे बाजू मांडण्यासाठी हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती. समितीची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली होती. या दरम्यान १०० विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थी पोहचले होते. उर्वरीत विद्यार्थ्यांना दुसऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली. यातून केवळ ७ विद्यार्थी समितीसमोर हजर झाले. त्यानंतर तिसरी संधी सुद्धा त्यांना देण्यात आली. यात ७५ विद्यार्थ्यांचा समावेश होता. पण हे विद्यार्थी समितीपुढे हजर झाले नाही. त्यामुळे बोर्डाने एकतर्फी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी सांगितले की, बारावीच्या परीक्षेच्या निकालाचे काम पूर्णत्वास आले आहे. निकाल घोषित करण्याची अंतिम तयारी सुरू आहे. त्यापूर्वी या विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णय घेणे आवश्यक आहे. जेव्हापर्यंत निर्णय होणार नाही. तेव्हापर्यंत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करता येणार नाही. त्यामुळे बोर्डाने समितीची बैठक बोलावून यात कारवाईचा प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोषी विद्यार्थ्यांवर प्रकरणाचे गांभीर्य लघात घेऊन पुढच्या पाच परीक्षेपर्यंत रस्टीकेट करता येऊ शकते. यासंदर्भात विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

Web Title: One-sided action will be taken by board to 75coppy cheater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.