एकच नारा ‘सातबारा’ : अतिक्रमित महसूल जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:05 PM2018-07-19T23:05:45+5:302018-07-19T23:06:37+5:30

बहुजन भूमिहीनांच्या आर्थिक उत्थानासाठी २०१० पर्यंत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देण्याचा निर्णय त्वरित घ्या, या मागणीला घेऊन भूमी मुक्ती व बहुजन मुक्ती मोर्चाने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. ‘एकच नारा, सातबारा’ अशा घोषणा देत मोर्चाचा परिसर दणाणून सोडला.

One slogan 'Satbara': Give land rent of encroached revenue | एकच नारा ‘सातबारा’ : अतिक्रमित महसूल जमिनीचे पट्टे द्या

एकच नारा ‘सातबारा’ : अतिक्रमित महसूल जमिनीचे पट्टे द्या

googlenewsNext
ठळक मुद्देभूमी मुक्ती मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुजन भूमिहीनांच्या आर्थिक उत्थानासाठी २०१० पर्यंत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देण्याचा निर्णय त्वरित घ्या, या मागणीला घेऊन भूमी मुक्ती व बहुजन मुक्ती मोर्चाने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. ‘एकच नारा, सातबारा’ अशा घोषणा देत मोर्चाचा परिसर दणाणून सोडला.
बुलडाणा येथून निघालेला भूमिहीनांचा या ‘आसूड’ मोर्चाला मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट रोडवर पोलिसांनी थांबविले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. प्रदीप अंभोरे म्हणाले, अलीकडे भूमिहीनांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर शासन आपले अधिकार दाखवीत असल्याने ते बेघर होत आहेत. दुसरीकडे १०० टक्के कर्जमाफीचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसून येत नाही. यामुळे नैराश्य आलेल्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. हे थांबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देणे व १०० टक्के कर्जमाफीचा निर्णय घेणे, हाच यावर उपाय आहे.
या मोर्चाचे नेतृत्व प्रदीप अंभोरे, डॉ. राजीव वाघमारे, महादेवराव वरठे, प्रकाश वानखेडे, अशोक इंगळे, संजय इंगळे, महादेवराव आवळे, मुन्ना पराते, दिलीप रामटेककर आदींनी केले.

 

Web Title: One slogan 'Satbara': Give land rent of encroached revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.