नागपुरात रस्त्यावर थुंकल्यास एक ते दहा हजार दंड; शिक्षाही होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:17 PM2020-06-02T22:17:05+5:302020-06-02T22:19:51+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता विविध कायद्यांतर्गत नागपूर शहरात सार्वजनिक ­ ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व पान, सुपारी तंबाखूजन्य पदार्थचे सेवन करणाºया, थुंकणाºया व्यक्तींला एक ते पाच हजारांपर्यंत दंड व पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकासह (एनडीएस) विविध अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात सोमवारी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे.

One to ten thousand fines for spitting on the streets in Nagpur; There will be punishment | नागपुरात रस्त्यावर थुंकल्यास एक ते दहा हजार दंड; शिक्षाही होणार

नागपुरात रस्त्यावर थुंकल्यास एक ते दहा हजार दंड; शिक्षाही होणार

Next
ठळक मुद्देमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्देश : शिक्षाही होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता विविध कायद्यांतर्गत नागपूर शहरात सार्वजनिक ­ ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व पान, सुपारी तंबाखूजन्य पदार्थचे सेवन करणाऱ्या, थुंकणाऱ्या व्यक्तींला एक ते पाच हजारांपर्यंत दंड व पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकासह (एनडीएस) विविध अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. मनपा आयुक्ततुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात सोमवारी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे.
नागपुरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व धुम्रपानास (ई-सिगारेटसह) प्रतिबंध करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार तसेच भादंविच्या तसेच मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होते व विद्रुप झालेल्या भिंती पुन्हा-पुन्हा रंगविण्यासाठी जनतेने कर रुपाने दिलेला पैसा खर्च करणे प्रशासनास भाग पडते व यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो व याच दुष्परिणामामुळे कर्करोग, श्वसन आजार, पुनरुत्पादन संस्थेचे आजार, पचनसंस्थेचे आजार तसेच क्षयरोग, स्वाईन फ्लू, न्युमोनिया यासारख्या प्राणघातक आजारांचा फैलाव होतो. आता तर कोविडसारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याने निष्पन्न झाल्याने याबाबत अतिदक्षता घेऊन सर्व जनतेच्या हितास्तव प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास्तव शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २९ मे रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

अशी आहे शिक्षेची तरतूद
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धुम्रपान करणाºयास मुंबई पोलीस अधिनियम कलम १९५१ च्या कलम ११६ अनुसार पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तीला दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसºया व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड व ५ दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे. भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम २६९ अंतर्गत ६ महिने शिक्षा किंवा दंड , कलम २७० अंतर्गत २ वर्ष शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम २७२ अंतर्गत ६ महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम २७८ अंतर्गत रुपये ५०० पर्यंत दंडाचे प्रावधान आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण) कायदा २००३ च्या कलम ४ चा अंतर्गत रुपये २०० पर्यंत दंड, कलम ५ अंतर्गत पहिला गुन्ह्यासाठी १००० पर्यंत दंड किंवा २ वर्षे शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्ह्यासाठी ५हजार पर्यंत दंड किंवा ५ वर्षे शिक्षा, कलम ६ अ, ७ ब साठी रु. २०० पर्यंत दंड, कलम ७ अंतर्गत उत्पादकाला पहिला गुन्ह्यासाठी ५हजार पर्यंत दंड किंवा २ वर्षे शिक्षा किंवा दोन्ही तसेच दुसºया गुन्ह्यासाठी १०हजारपर्यंत दंड किवा ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. विक्रेत्याला पहिल्या गुन्ह्याला १ हजार पर्यंत दंड किंवा १ वर्षाची शिक्षा व दुसºया गुन्ह्यासाठी ३ हजार पर्यंत दंड किंवा २ वर्षे अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

आदेश येथे लागू राहतील
महानगरपालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, विविध मंडळे, परिमंडळ, महामंडळे, औद्योगिक वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय, रहिवासी क्षेत्र व संकुले, रेल्वे स्थानके, बस स्थानके, न्यायालयीन संस्था, देवस्थाने, बगिचे, पर्यटनस्थळे, शॉपिंग मॉल, तरणतलाव, सिनेमागृह, व्यायामशाळा, रस्ते, बाजारपेठा, हॉटेल्स आदी संस्था, आस्थापना व सार्वजनिक क्षेत्रांच्या ठिकाणी आणि आवारातही हा कायदा लागू राहील.

मनपा व पोलीस विभाग कारवाई करणार
या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता नागपूर महापालिकेने उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, संबंधित झोनचे सहायक आयुक्त व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे नागपूर महापालिकेतील संबंधित अधिकारी, नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व संबंधित पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे विविध पोलीस अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.

सुगंधित तंबाखू व सुपारी विक्रीला प्रतिबंध
नागरिकांसोबतच संबंधित दुकानदारांनी, व्यावसायिकानीं सुध्दा याबाबीचे गंभीर्य लक्षात घेवून सदर आदेशाचे पालन करावे. स्वादिष्ट/सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट/सुगंधित सुपारी यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री यावर सुध्दा शासन आदेशानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे.

Web Title: One to ten thousand fines for spitting on the streets in Nagpur; There will be punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.