केंद्र सरकारला मागणार एक हजार कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 12:16 AM2020-10-04T00:16:45+5:302020-10-04T00:18:37+5:30

Nana Patole , Health Machinary , Nagpur News नागपूरमधील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी ५०० कोटी रुपये देण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे आपण स्वत: मागणी केली आहे. त्यामध्ये आणखी भर टाकून विदर्भाच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या मेयो, मेडिकल व एम्स यंत्रणेला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.

One thousand crore rupees will be demanded from the central government | केंद्र सरकारला मागणार एक हजार कोटी रुपये

केंद्र सरकारला मागणार एक हजार कोटी रुपये

Next
ठळक मुद्देविधानसभा अध्यक्ष नाना पटोले : प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमधील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी ५०० कोटी रुपये देण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे आपण स्वत: मागणी केली आहे. त्यामध्ये आणखी भर टाकून विदर्भाच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या मेयो, मेडिकल व एम्स यंत्रणेला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.
पटोले यांनी शनिवारी हैदराबाद हाऊस येथे कोरोनाच्या वाढत्या मृत्यूदराचा आढावा घेतला. बैठकीत आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा आदी उपस्थित होते.
पटोले यांनी यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला. त्यांनी आरोग्य यंत्रणा सशक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकांची टेस्ट करण्याचे निर्देश दिले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मेडिकलमध्ये आणखी ४०० बेड उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

खासगी रुग्णालयांच्या बिलांची तपासणी
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यावेळी सांगितले की, खासगी रुग्णालयांद्वारे कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या बिलांची तपासणी केली जात आहे. अधिक दर वसूल करणाऱ्या ८८ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आहे. यात ३६ लाख रुपये परत करण्याचे निर्देशही देण्यात आले.

Web Title: One thousand crore rupees will be demanded from the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.