नागपूर जिल्ह्यातील असेही एक गाव विकासाने झपाटलेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:40 PM2018-09-14T23:40:35+5:302018-09-14T23:41:57+5:30

ग्रा.प.निवडणूक म्हणजे गटबाजी आली. या गटबाजीतून होणारे वाद आणि भांडणेही नवीन नाही ! वैमनस्य असल्याशिवाय हल्ली गावातील राजकारणच पुढे सरकत नाही. मात्र या सर्व बाबींना बगल देत केवळ विकासाच्या मुद्यावर एकसंघ होत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मरगसूरच्या ग्रामस्थांनी एक नवा आदर्श समाजापुढे आणि भरकटत चाललेल्या राजकारण्यापुढे उभा केला आहे. गावाच्या विकासावर एकमत करीत येथे सलग तिसऱ्यांदा ग्रा.प.ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.

One of the villages in Nagpur district too possessed by the development! | नागपूर जिल्ह्यातील असेही एक गाव विकासाने झपाटलेले !

नागपूर जिल्ह्यातील असेही एक गाव विकासाने झपाटलेले !

Next
ठळक मुद्देसलग तिसऱ्यांदा ग्रा.प.बिनविरोध : राजकारणी घेणार का आदर्श ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रा.प.निवडणूक म्हणजे गटबाजी आली. या गटबाजीतून होणारे वाद आणि भांडणेही नवीन नाही ! वैमनस्य असल्याशिवाय हल्ली गावातील राजकारणच पुढे सरकत नाही. मात्र या सर्व बाबींना बगल देत केवळ विकासाच्या मुद्यावर एकसंघ होत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मरगसूरच्या ग्रामस्थांनी एक नवा आदर्श समाजापुढे आणि भरकटत चाललेल्या राजकारण्यापुढे उभा केला आहे. गावाच्या विकासावर एकमत करीत येथे सलग तिसऱ्यांदा ग्रा.प.ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ३७० पेक्षा अधिक ग्रा.प.मध्ये २६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. यासाठी गावोगावी गटबाजी आणि प्रचाराला उधाण आले असतांना आज मरगसूरमध्ये मात्र विकासपर्वाचा गुलाल उधळला जात आहे.
तालुक्यातील मरगसूर व आलागोंदी ही दोन गावे मिळून गटग्रामपंचायत मरगसूर बनलेली आहे. गावातील शिक्षित तरु ण माजी सरपंच हरिभाऊ मोहतकर व श्रीकृष्ण मानकर यांनी एकत्रित गावचे प्रबोधन केले. म्हणून सलग तिसºयांदा ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली.
पहिल्या वेळेस श्रीकृष्ण मानकर तर दुसऱ्यांदा हरिभाऊ मोहतकर अविरोध सरपंच झाले होते.आता सरपंचपदाची माळ संगीता मानकर यांच्या गळात पडली असून सदस्य म्हणून हरिभाऊ मोहतकर ,अरु ण टेकाम,राजेंद्र गोतमारे,अनसूया इरपाची,विनिता सहारे, शशिकला नेहारे,सीमा नेहारे बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.
मागील वेळेस सरपंच हरिभाऊ मोहतकर यांनी ग्रामपंचायत सभागृह, स्मशानभूमी रस्ता व शेड,आलागोंदी शाळेला सुरक्षा भिंत,तलाव दुरु स्ती,पाणीपुरवठा योजना,भवानी माता धाम विकास ,गटार व्यवस्था, घरकुल योजनेत घरे,आदिवासी वस्तीत सिमेंट रस्ते व दिव्याची सोय, एल.ए.डी लाईट प्रकाश योजना,आलागोंदी येथे टाकीची व्यवस्था,आलागोंदी डिजिटल शाळा इत्यादी विकासात्मक कामे केली.यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा निवडणूक बिनविरोध होण्याकरिता सहकार्य केले.
सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, युवा नेते सलील देशमुख, जि. प. सदस्य चंद्रशेखर चिखले, सामाजिक कार्यकर्ते जयंत टालाटूले,बंडू राठोड,संजय डांगोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

 

 

Web Title: One of the villages in Nagpur district too possessed by the development!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.