नागपूर पोलिसांची ऑनलाईन तक्रार सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 07:30 AM2020-10-05T07:30:00+5:302020-10-05T07:30:02+5:30

Online, Police, Nagpur News ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा पोलीस विभागाने उपलब्ध करून दिली होती. पण ही सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद पडली आहे. नागपूर पोलीसच नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रारच होत नसल्याची तक्रारकर्त्यांची ओरड आहे.

Online complaint service of Nagpur police closed | नागपूर पोलिसांची ऑनलाईन तक्रार सेवा बंद

नागपूर पोलिसांची ऑनलाईन तक्रार सेवा बंद

googlenewsNext
ठळक मुद्देवेबसाईटवर ऑनलाईनचे ऑप्शन पण रजिस्टरच होत नाही कम्प्लेंट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास अडखळतो. ठाण्यामध्ये पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे अनेक लोक तक्रार देण्यासही धजावत नाहीत. अशा लोकांसाठी पोलीस स्टेशन न गाठता, ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा पोलीस विभागाने उपलब्ध करून दिली होती. पण ही सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद पडली आहे. नागपूर पोलीसच नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रारच होत नसल्याची तक्रारकर्त्यांची ओरड आहे.

ऑनलाईन तक्रार करणे ही सुविधा फार सोपी आहे. ऑनलाईन तक्रारीची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घ्यावी लागत असल्याने, कारवाई झपाट्याने होत असल्याचेही ऑनलाईन तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. नागपुरातील हेमंत गांजरे यांनी या सेवेचा लाभही घेतला आहे. पण ही सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचे गांजरे यांचे म्हणणे आहे. नागपूर पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचे ऑप्शन आहे. परंतु तक्रार दाखल करण्यास हे वेबपेज उघडले तर समोर जात नाही. त्यामुळे तक्रार दाखल केली जाऊ शकत नाही. गांजरे यांनी यासंदर्भात पोलीस महासंचालकांना ई-मेलवर तक्रार दाखल केली होती. महासंचालकांनी तक्रारीची दखल घेऊन पोलीस आयुक्त आणि डीसीपी इकॉनॉमिक यांना सूचना दिल्या होत्या. डीसीपी इकॉनॉमिक यांनी गांजरे यांना ऑनलाईन तक्रार सेवा सुरळीत झाल्याचे ई-मेलद्वारे कळविले होते. मात्र ही सुविधा अजूनही सुरळीत झालेली नाही.

- जनतेसाठी सुविधाजनक
एखाद्या पीडितावर दबाव वाढत असेल, पोलीस ठाण्यास जाण्यास त्याला भीती वाटत असेल तर घरबसल्या ऑनलाईन तक्रार करता येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार जात असल्याने त्याची दखल तात्काळ होते. ऑनलाईन तक्रार सेवा सुरू ठेवणे ही जनतेसाठी सुविधा आहे, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Online complaint service of Nagpur police closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस