ऑनलाईन शिक्षणामुळे झाले विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:11 AM2021-08-23T04:11:20+5:302021-08-23T04:11:20+5:30

नागपूर : ऑनलाईन शिक्षणामुळे एकीकडे शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झाला असून ७० टक्के विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची उद्विग्न भावना संविधान परिवारच्या ...

Online education destroys students' lives () | ऑनलाईन शिक्षणामुळे झाले विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त ()

ऑनलाईन शिक्षणामुळे झाले विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त ()

Next

नागपूर : ऑनलाईन शिक्षणामुळे एकीकडे शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झाला असून ७० टक्के विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची उद्विग्न भावना संविधान परिवारच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. सरकारने तात्काळ शाळा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

काेराेना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र या ऑनलाईनमुळेच विद्यार्थ्यांचे अताेनात नुकसान हाेत आहे. मुलांची मानसिक व शारिरीक शक्ती क्षीण हाेत असून डाेकेदुखी, डाेळेदुखी, चिडचिडेपणा अशा आजारांचा विळखा पडला आहे. डाेळ्याखाली काळे डाग पडत आहेत. बालपणापासून हातात माेबाईल गेल्याने त्यांच्यात वाईट प्रवृत्तीत वाढ हाेत आहे. अनेक विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली अनुचित साईट्सवर जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान हाेण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे असंख्या विद्यार्थ्यांकडे ॲन्ड्राईड माेबाईल नसल्याने त्यांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागते आहे.

आता काेराेनाचा विळखाही ओसरत चालला आहे. त्यामुळे शासनाने ही बाब गंभीरतेने घेऊन त्वरित शाळा सुरू कराव्या, अशी मागणी चर्चेतून करण्यात आली. यावेळी प्रा. मनाेहर तांबुलकर, कृष्णा येरावार, सुनील जवादे, प्रदीप मून, अनिल इलमकर, जितेंद्र जिभे यांनी मनाेगत व्यक्त केले. संविधान परिवारचे प्रा. राहुल मून यांनी प्रास्ताविक केले. सहदेव भगत, संजय आंभाेरे, राजेंद्र साठे, मृणाल बागडे, सेवक मून, प्रज्वल मून, अॅड. सुरेश घाटे, अरुण साखरकर, डाॅ. मनाेहर आंबुलकर, मिलिंद खैरकर, प्रवीण गजभिये, राेशन पाटील, डाॅ. अविनाश कांबळे, पवन मेश्राम, प्रा. मिलिंद खेडकर, जयश्री हुमने, माला वासनिक आदींचा सहभाग हाेता.

Web Title: Online education destroys students' lives ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.