आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 21:50 IST2022-11-18T21:49:47+5:302022-11-18T21:50:11+5:30
Nagpur News एका अज्ञात आरोपीने शांतीनगर भागातील बीबीएच्या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून १ लाख ४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.

आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणूक
नागपूर : एका अज्ञात आरोपीने शांतीनगर भागातील बीबीएच्या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून १ लाख ४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. तक्रारदार त्रिशा यादव (२०) ही बीबीएची विद्यार्थिनी आहे.
त्रिशाला ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात आरोपीचा व्हॉट्सॲपवर कॉल आला. त्रिशाला बीबीएची पदवी मिळताच एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे त्याने आमिष दाखविले. त्यासाठी लिंक पाठवून आवश्यक माहिती देऊन प्रक्रिया शुल्क भरण्यास त्याने सांगितले. त्रिशाने लिंक ओपन करून माहिती टाकताच तिच्या खात्यातून १० हजार ४४० रुपये, आईच्या खात्यातून ७३ हजार २७४ रुपये आणि वडिलांच्या बँक खात्यातून २० हजार ४४० रुपये ऑनलाइन व्यवहारातून अन्य अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी मोबाइलधारक आरोपीविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.