ऑनलाईन व्यवहारात, ग्रंथांचे स्थान काय? प्रकाशनसंस्थांनी घेतला धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:07 AM2020-11-04T11:07:49+5:302020-11-04T11:08:18+5:30

Books Nagpur News टाळेबंदीपूर्वीही ऑनलाईन पुस्तके मागवण्यात कुचराई होती, तशीच स्थिती टाळेबंदी आणि अनलॉकनंतरही असल्याचे प्रकाशक सांगत आहेत.

In online transactions, what is the place of texts? The publishing house took the plunge | ऑनलाईन व्यवहारात, ग्रंथांचे स्थान काय? प्रकाशनसंस्थांनी घेतला धसका

ऑनलाईन व्यवहारात, ग्रंथांचे स्थान काय? प्रकाशनसंस्थांनी घेतला धसका

googlenewsNext
ठळक मुद्देमोबाईल वाढेल का वाचनसंस्कृती?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रत्येकच व्यवहारात सरसकट ऑनलाईनचे प्रचलन वाढते आहे. मात्र, त्यात पुस्तकांचे स्थान काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टाळेबंदीपूर्वीही ऑनलाईन पुस्तके मागवण्यात कुचराई होती, तशीच स्थिती टाळेबंदी आणि अनलॉकनंतरही असल्याचे प्रकाशक सांगत आहेत.

वाचनसंस्कृतीच्या बाबतीत ती कधीचीच रसातळाला गेली, असा आरोप होतो. टाळेबंदीत अनेकांनी फ्रस्ट्रेशन घालविण्यासाठी पुस्तकांचा आधार घेतला. मात्र, तशी तथ्यात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. कारण, मनोरंजनाचे अनेक पर्याय पूर्वी होतेच आणि नंतरही असणारच आहेत. अशा स्थितीत पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय अखेरच्या घटका मोजत असल्याचे सांगितले जाते. अनेक प्रकाशन संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे, काळानुसार मोबाईल टेक्नोसॅव्ही काळाच्या जवळ जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. मात्र, हा मार्ग प्रकाशन संस्थांना तारेल का, असा प्रश्न आहे.

वाचन जागर अभियान

वाचन संस्कृतीवर आलेली मरगळ बघता आणि प्रकाशन संस्थांची बिकट स्थिती बघता राज्यातील प्रमुख दहा प्रकाशन संस्थांनी एकत्रित येत ‘वाचन जागर अभियान’ राबवले आहे. १ ते २५ नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार असून, राज्यातील ३२ ठिकाणी २५ टक्के सवलतीने ही पुस्तके उपलब्ध होणार आहेत. यात राजहंस, मनोविकास, मेहता, मॅजेस्टिक, ज्योत्स्ना, साधना, पद्मगंधा, रोहण, डायमंड, साकेत या दहा प्रकाशन संस्थांच्या प्रत्येकी २५ पुस्तकांचा समावेश आहे.

चिंता रोजगाराची, पुस्तके काय वाचणार? - अरविंद पाटणकर

खरे सांगायचे तर सुरुवातीला ऑनलाईन पुस्तके मागवण्याचे प्रचलन नाहीच्या बरोबर होते. टाळेबंदीत दुकाने बंद असल्याने ऑनलाईन पुस्तके मागवण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, त्या काळात तेही शक्य नव्हते. नंतर रोजगाराची चिंता निर्माण झाली आणि तेव्हा वाचनात कुणाचे मन रमत असेल, असे वाटत नाही. आभासी माध्यमाद्वारे काही पुस्तकांचे प्रकाशन झाले आणि विक्रीलाही उपलब्ध आहेत. मात्र, दिवाळीनंतर सर्व मार्केट ओपन झाल्यावरच काय ती आशा बळावेल. यामुळे मात्र, प्रकाशकांचे सगळेच काम थांबल्याचे मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटणकर यांनी सांगितले.

ऑनलाईन पुस्तके वाचणेच मुळात बेकायदेशीर - नरेश सब्जीवाले

ऑनलाईन पुस्तके वाचणे, हे बेकायदेशीर आहे. एखाद्याला पुस्तकाची पीडीएफ कॉपी पाठवली तर तो आणखी अनेकांना ती पाठवतो. अशाने प्रकाशकांचा व्यवसाय चौपट होईल. त्यामुळे असा पर्याय प्रकाशक देणार नाहीत. शिवाय ऑनलाईन वाचन हे मर्यादित आहे. पुस्तकांची जागा ही व्यवस्था घेऊ शकत नाही. त्यामुळे, अनेकांचे वाचन अर्धेच असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे मोबाईल किंवा ई-बुकद्वारे काहीसे शुल्क आकारून तसा पर्याय देण्यावर आम्ही प्रयत्न करतो आहोत. काही दिवसांसाठी ते पुस्तक टॅग करून ठेवल्यावर त्यांना पुस्तक खरेदी करण्याचा पर्याय असतो. तेव्हा ऑनलाईन विक्री केली जात असल्याचे राजहंस प्रकाशनचे नरेश सब्जीवाले यांनी सांगितले.

 

Web Title: In online transactions, what is the place of texts? The publishing house took the plunge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल