उच्च न्यायालयात उन्हाळ्याच्या सुट्यानंतरही ऑनलाईन कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:38+5:302021-06-04T04:07:38+5:30

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये उन्हाळ्याच्या सुट्यानंतरही ऑनलाईन कामकाज होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्या ६ जून ...

Online work even after summer vacation in High Court | उच्च न्यायालयात उन्हाळ्याच्या सुट्यानंतरही ऑनलाईन कामकाज

उच्च न्यायालयात उन्हाळ्याच्या सुट्यानंतरही ऑनलाईन कामकाज

Next

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये उन्हाळ्याच्या सुट्यानंतरही ऑनलाईन कामकाज होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्या ६ जून रोजी संपणार आहेत. त्यानंतर ७ ते ११ जूनपर्यंतच्या कामकाजाची व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.

यासंदर्भातील नोटीसनुसार, ८ व १० जून रोजी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे हे दिवाणी रिट याचिका, सर्व जनहित याचिका, न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर हे फौजदारी अपील, फौजदारी रिट याचिका, न्या. रोहित देव हे फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज, न्या. मनीष पितळे हे दिवाणी रिट याचिका, दिवाणी रिव्हिजन अर्ज, नियमित जामीन अर्ज, न्या. नितीन सूर्यवंशी हे २०१२ व त्यापुढील वर्षांतील फौजदारी अपील, सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतचे अर्ज, ७ व ११ जून रोजी न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क अर्ज, संदर्भ व अपील, लेटर्स पेटेन्ट अपील, प्रथम अपील, कुटुंब न्यायालय अपील, अवमानना अपील व याचिका, न्या. स्वप्ना जोशी या द्वितीय अपील, किरकोळ दिवाणी अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज, न्या. श्रीराम मोडक हे प्रथम अपील, अपील अगेन्स्ट ऑर्डर, न्या. विनय जोशी हे नियमित जामीन अर्ज, २०११ पर्यंतच्या फौजदारी अपील, फौजदारी रिव्हिजन अर्ज, १० जून रोजी न्या. श्रीराम मोडक हे प्रथम अपील, अपील अगेन्स्ट ऑर्डर, नियमित जामीन अर्ज तर, ८, ९ व १० जून राेजी न्या. अनिल किलोर हे अटकपूर्व जामीन अर्जांचे कामकाज पाहतील.

Web Title: Online work even after summer vacation in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.