मेडिकलमध्ये केवळ १०० रक्तपिशव्या
By admin | Published: May 16, 2016 03:04 AM2016-05-16T03:04:59+5:302016-05-16T03:04:59+5:30
मेडिकलच्या रक्तपेढीत रोज ३० ते ५० रक्तपिशव्यांची गरज भासते. परंतु सध्याच्या स्थितीत १०० रक्तपिशव्या उपलब्ध आहेत.
रक्ताचा तुटवडा
नागपूर : मेडिकलच्या रक्तपेढीत रोज ३० ते ५० रक्तपिशव्यांची गरज भासते. परंतु सध्याच्या स्थितीत १०० रक्तपिशव्या उपलब्ध आहेत. यातही निगेटिव्ह रक्तगटाच्या पिशव्यांचा फारच कमी साठा शिल्लक आहे. कुणाला फारच गरज पडली तर अशा रक्तगटाच्या दात्याला बोलवून रक्त उपलब्ध करून दिले जात आहे. मेयो रक्तपेढीची स्थिती याहीपेक्षा वाईट आहे. डागाच्या रक्तपेढीत १२३ रक्तपिशव्या आहेत. या पेढीवर रुग्णालयासोबतच १०४ ‘ब्लड आॅन कॉल’ ही योजना असल्याने हा साठा पुरेसा नसल्याचे सांगण्यात येते. खासगी रक्तपेढ्यांमध्ये इतर दिवसांत १०-१५ दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध करून ठेवला जायचा, परंतु सध्या दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)