वर्षभरात केवळ १३ दिवस सकाळी ७ ते रात्री १२ ध्वनिक्षेपकाला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 08:56 PM2022-02-18T20:56:45+5:302022-02-18T20:57:29+5:30

Nagpur News आगामी वर्षामध्ये ध्वनिपेक्षक व ध्वनिवर्धक वापरण्यासंबंधी जिल्ह्याच्या निकडीनुसार दिवस निश्चित करून सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Only 13 days a year from 7 am to 12 midnight loud speakers allowed | वर्षभरात केवळ १३ दिवस सकाळी ७ ते रात्री १२ ध्वनिक्षेपकाला परवानगी

वर्षभरात केवळ १३ दिवस सकाळी ७ ते रात्री १२ ध्वनिक्षेपकाला परवानगी

Next
ठळक मुद्देस्थानिक परिस्थिती व आवश्यकता पाहून आणखी दोन दिवस मिळणार

नागपूर : वर्षभरात केवळ १३ दिवस सकाळी ७ ते रात्री १२ या कालावधीसाठी ध्वनिक्षेपकाला परवानगी राहील.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी आढावा घेतला.

बैठकीत नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी सण/उत्सवासाठी १५ दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याच्या परवानगीसाठीची माहिती या कार्यालयास सादर केली होती. तसेच आगामी वर्षामध्ये ध्वनिपेक्षक व ध्वनिवर्धक वापरण्यासंबंधी जिल्ह्याच्या निकडीनुसार दिवस निश्चित करून सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी नागपूर यांच्यावतीने जिल्ह्यात १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत १५ दिवसांपैकी १३ दिवस सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याची परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. तसेच उर्वरित २ दिवस हे स्थानिक परिस्थिती व आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात येतील, असे ठरविण्यात आले.

- या दिवशी राहील परवानगी...

२१ मार्च - शिवाजी महाराज जयंती

१० एप्रिल - रामनवमी,

१४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१६ एप्रिल - हनुमान जयंती

१६ मे - बुध्द पौर्णिमा

३१ - ऑगस्ट

५ - सप्टेंबर

९ सप्टेंबर - गणपती उत्सव,

३ ऑक्टोबर- नवरात्री उत्सव,

५ ऑक्टोबर - दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन,

९ ऑक्टोबर- ईद- ए-मिलाद,

२५ डिसेंबर- ख्रिसमस

३१ डिसेंबर नववर्ष आगमन उत्सव

Web Title: Only 13 days a year from 7 am to 12 midnight loud speakers allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.