राज्यात फक्त १७२ स्पेशालिस्ट डॉक्टर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:10 AM2021-02-17T04:10:39+5:302021-02-17T04:10:39+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनामुळे आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. साध्या आजारावरील उपचारासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाण्याचा कल वाढला आहे. ...

Only 172 specialist doctors are working in the state | राज्यात फक्त १७२ स्पेशालिस्ट डॉक्टर कार्यरत

राज्यात फक्त १७२ स्पेशालिस्ट डॉक्टर कार्यरत

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनामुळे आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. साध्या आजारावरील उपचारासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाण्याचा कल वाढला आहे. असे असताना, आरोग्य विभागाकडे स्पेशालिस्ट डॉक्टरांची अवघी ६८० पदे मंजूर आहेत. यातही १७२ पदे भरली असून तब्बल ५०८ पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा लंगडी होत चालल्याचे धक्कादायक चित्र आहे.

राज्यात आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यासारखी शासकीय रुग्णालये जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जिवावर चालली आहेत. अत्यल्प वेतनावर या विभागात डॉक्टरांपासून ते परिचारिका व कर्मचारी काम करत आहेत. बहुतेक ठिकाणी ‘एमबीबीएस’ डॉक्टरांची शेकडो पदे रिक्त आहेत. विशेषज्ञ डॉक्टरांची पदे केवळ नावालाच आहेत. परिणामी, आरोग्य विभागाचे बहुतेक उपक्रम हे ताकदीनिशी राबविणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात रिक्त असलेल्या स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या रिक्त पदांची विषयावर माहिती उपलब्ध झाली नाही; परंतु या क्षेत्रातील तज्ज्ञानुसार, जनरल सर्जन, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, ईएनटीतज्ज्ञ, पॅथोलॉजीतज्ज्ञ, रेडिओलॉजीतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञांच्या मंजूर पदांपैकी जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, बधिरीकरणतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञांची सुमारे ४० टक्केही पदे भरलेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

-पूर्व विदर्भात ग्रामीण रुग्णालयांची स्थिती बिकट

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील रुग्णालयात विविध विषयांतील विशेषज्ञांची पदे रिक्त असल्याने बिकट स्थिती निर्माण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, फिजिशियनची २८ पैकी सुमारे ११ पदे, बालरोगतज्ज्ञांची १०५ पैकी ४० पदे, जनरल सर्जनची २७ पैकी ६ पदे, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञांची १०९ पैकी ५० पदे, बधिरीकरणतज्ज्ञांची १०७ पैकी ५६ पदे, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञांची २२ पैकी ४ पदे, नेत्ररोगतज्ज्ञांची २० पैकी ४ पदे, त्वचारोगतज्ज्ञांची दोन्ही पदे, ईएनटीतज्ज्ञांची सहाही पदे, पॅथोलॉजीतज्ज्ञांची सातही पदे, रेडिओलॉजीतज्ज्ञांची आठपैकी २ पदे, मानसोपचारतज्ज्ञांची पाचही पदे, रक्तसंक्रमण अधिकारीची (बीटीओ) ६ पैकी पाच पदे तर तर पीएसएमतज्ज्ञांची १७ पैकी ७ पदे अशी एकूण सुमारे २२२ पदे रिक्त आहेत.

-विशेषज्ञ डॉक्टरांची ५० टक्के पदे भरली जाणार

राज्यात विशेषज्ञ डॉक्टरांची मोठ्या संख्येत पदे रिक्त आहेत. यातील ५० टक्के पदे भरण्याला मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही पदे भरली जाणार आहेत.

-डॉ. साधना तायडे

संचालक, आरोग्य विभाग

Web Title: Only 172 specialist doctors are working in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.