कृषी विभागाच्या रेकॉर्डवर जिल्ह्यात फक्त ३२ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:35+5:302021-06-23T04:06:35+5:30

नागपूर : यंदा दमदार पाऊस असेल, मान्सूनही वेळेवर आणि भरघोस बरसेल, असे हवामान विभागाकडून सांगितले जात असताना दरवर्षीप्रमाणे हवामान ...

Only 32% sowing in the district on the record of agriculture department | कृषी विभागाच्या रेकॉर्डवर जिल्ह्यात फक्त ३२ टक्के पेरण्या

कृषी विभागाच्या रेकॉर्डवर जिल्ह्यात फक्त ३२ टक्के पेरण्या

Next

नागपूर : यंदा दमदार पाऊस असेल, मान्सूनही वेळेवर आणि भरघोस बरसेल, असे हवामान विभागाकडून सांगितले जात असताना दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला आहे. मृगाच्या प्रारंभात जोमाने आलेला पाऊस आता थंडावला. यामुळे पावसाच्या आशेवर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर आता आभाळाकडे पाहण्याची वेळ आली आहे.

जिल्हा कृषी विभागाने नोंदविल्यानुसार, जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (२२ जून) ३२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. याचा अर्थ अद्याप ६८ कृषी क्षेत्रावर पेरण्या बाकी आहेत. धानाचा पेरा अधिक असला तरी रोवणीसाठी पुरेसा पाऊसच झालेला नाही. ३९९ हेक्टरवर धान रोवणी झाली आहे. सोयाबीनचा पेरा आणि कापसाची लागवड अधिक असली तरी पावसामुळे या पिकांचा धोका अधिक आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाला आणि हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. आता पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मृगाचे वाहन गाढव, तर आर्द्राचे कोल्हा आहे. हे दोन्ही नक्षत्र आपल्या वाहनानुसार वागले तर पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आधिक आहे.

.....

अपेक्षित पाऊस - १२२ मिमी

आतापर्यंत झालेला पाऊस - १३९.१ मिमी

सर्वात कमी पाऊस - ६९.७ मि.मी. रामटेक तालुका

सर्वात जास्त पाऊस - १९२.४ मि.मी. नागपूर ग्रामीण तालुका

....

कोठे किती पेरणी (हेक्टरमध्ये)

अपेक्षित पेरणी क्षेत्र : ४,७४,३२५.१

आतापर्यंत झालेली पेरणी : १,५५,०६२

पेरणीची टक्केवारी : ३२.६९

....

तालुकानिहाय पेरणी आणि झालेला पाऊस

तालुका - झालेला पाऊस - पेरणी (हेक्टरमध्ये)

नागपूर (ग्रामीण) - १९२.२ - ८९,००१

कामठी - १८०.४ - २,३३१

हिंगणा - १५५.८ - १२,३५५

रामटेक - ६९.७ - १,१६८.३

पारशिवणी - ९६.७ - १,५६१

मौदा - ९२.६ - १,०७१

काटोल - ११२.४ - ११,९२३.१

नरखेड - १३७.९ - १७,५००

सावनेर - १०१.० - २४,८४२.८

कळमेश्वर - १०४.२ - १९,६०७.८

उमरेड - १६०.५ - २३,२९१

भिवापूर - १३०.७ - २४,६६१

कुही - १७९.७ - ४,९५०

.....

पीकनिहाय क्षेत्र

पीक : अपेक्षित पेरणी : झालेली पेरणी

भात : ९६,००० हे. : ३९९ हे.

ज्वारी : ४,००० हे. : ११४.५ हे.

मका : ८,००० हे. : २३२ हे.

तूर : ६५,००० हे. : २२,०७४ हे.

सोयाबिन : ८५,००० हे. : ३६,४५४ हे.

कापूस : २,१३,००० हे. : ९५,७२२ हे.

...

Web Title: Only 32% sowing in the district on the record of agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.