महापालिकेवर 'निळा'च झेंडा फडकविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:11 AM2021-08-14T04:11:47+5:302021-08-14T04:11:47+5:30

नागपूर : बहुजन समाज पार्टीची सुरुवातच नागपूरमधून झाली आहे. अशात नागपूर महापालिकेवर अभिमानाने 'निळा झेंडा' फडकविण्यासाठी सज्ज व्हा, अशा ...

Only 'blue' flag will be hoisted on NMC | महापालिकेवर 'निळा'च झेंडा फडकविणार

महापालिकेवर 'निळा'च झेंडा फडकविणार

googlenewsNext

नागपूर : बहुजन समाज पार्टीची सुरुवातच नागपूरमधून झाली आहे. अशात नागपूर महापालिकेवर अभिमानाने 'निळा झेंडा' फडकविण्यासाठी सज्ज व्हा, अशा सूचना बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी शुक्रवारी 'संवाद यात्रे'त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी ॲड. ताजने म्हणाले, बसपाच्या संघटनात्मक ताकदीचा रचनाबद्ध तसेच नियोजनबद्धरीत्या वापर केल्यास महापालिकेवर निळा झेंडा सहज फडकावता येऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नागपूरकरांवर बरेच प्रेम होते. सामाजिक बदलाची मोठी चळवळ नागपुरातून सुरू झाली. अशात राज्यात सत्ताधारी होण्याची सुरुवात नागपूर महापालिकेवर निळा झेंडा फडकवून करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या अनुषंगाने आतापासून बैठका आणि केडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. बसपाकडून विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून मतदारांना जागृत करण्याचे काम केले जाईल. जिल्ह्यात आतापर्यंत १२ 'कॅडर कॅम्प' शिस्तबद्धरीत्या आयोजित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत १० ते १२ नगरसेवक यापूर्वी पक्षाने निवडून आणले आहे. परंतु, यंदा बसपाचा महापौर बसणारच, असा दावाही ॲड. ताजने यांनी केला.

यावेळी प्रदेश महासचिव नागेाराव जयकर, सुनील डोंगरे, रवींद्र गवई, जिल्हा प्रभारी नितीनकुमार शिंगाडे, विजयकुमार डहाट, बाबूल डे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष इंजि. राजीव भांगे, गटनेते जितेंद्र घोडेस्वार, वंदना चांदेकर, वैशाली नारनवरे, इब्राहिम टेलर, मंगला लांजेवार, वीरंका भिवगडे, ममता सहारे, नरेंद्र वालदे, संजय बुरेवार, आदी उपस्थित होते.

५० टक्के जागांवर तरुणांना संधी

- तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी पक्षाकडून ५० टक्के तरुणांना भागीदारी दिली जाईल. पक्षाकडून आगामी नागपूर पालिकेच्या निवडणुकीत शिक्षण, गुणवत्ता, सामाजिक कार्याची जाण तसेच समाजसेवकरिता व्रतस्थांना उमेदवारी देण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे राज्य प्रभारी प्रमोद रैना यांनी दिली.

Web Title: Only 'blue' flag will be hoisted on NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.