नागपुरात मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:50 PM2019-06-24T22:50:02+5:302019-06-24T22:52:34+5:30

नागपूर जिल्ह्यात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये पाण्याच्या कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. पाण्याची शुद्धता आणि स्वच्छतेचे कुठलेही नियम न पाळता नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, अशा सर्व कंपन्यांची चैकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सोमवारी विधानपरिषद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.

Only cold water in the name of mineral water in Nagpur | नागपुरात मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाणी

नागपुरात मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाणी

Next
ठळक मुद्देविक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : विधानपरिषदेत प्रकाश गजभिये यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये पाण्याच्या कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. पाण्याची शुद्धता आणि स्वच्छतेचे कुठलेही नियम न पाळता नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, अशा सर्व कंपन्यांची चैकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सोमवारी विधानपरिषद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.
औचित्याच्या मुद्यावर बोलताना त्यांनी याविषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. आ. गजभिये यांनी सांगितले की, नागपूर शहर तसेच खेड्यापाड्यांमध्ये होणाऱ्या लग्न समारंभासह विविध कार्यक्रमांमध्ये त्याद्वारे पाण्याचे वितरण केले जाते. परंतु हे पाणी खरोखर शुद्ध आहे का हे पाहणे गरजेचे असून कोणतीही प्रक्रिया न करता हे थंड पाणी आपल्या गळी उतरवले जाते ही वस्तुस्थिती आहे. याकडे आरोग्य विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. पाणी विक्रीवर फूड सेफ्टी एक अंतर्गत सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा मार्फत तपासणी करून संबंधित कारखाने व विकणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी सातत्याने होत असून युविस्टरी डायजेशन सूक्ष्म गवळणी व ओझो डायजेशन इत्यादी प्रक्रिया करून हे पाणी किंवा नजारे उपलब्ध व्हावे असे अपेक्षित असते परंतु गल्लोगल्ली याचे कारखाने लावले असून मिनरल वॉटरच्या नावाखाली हे थंड पाणी सर्रास विकले जात आहे. लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये २० ते ६० रुपयांपर्यंत विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Only cold water in the name of mineral water in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.