आक्षेपार्ह ‘व्हॉट्सॲप’ संदेशासाठी केवळ एकच गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:07 AM2020-12-09T04:07:18+5:302020-12-09T04:07:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह संदेश पाठविण्यात येतात. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत तर याचे प्रमाण वाढले ...

Only one offense for an offensive ‘WhatsApp’ message | आक्षेपार्ह ‘व्हॉट्सॲप’ संदेशासाठी केवळ एकच गुन्हा

आक्षेपार्ह ‘व्हॉट्सॲप’ संदेशासाठी केवळ एकच गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह संदेश पाठविण्यात येतात. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत तर याचे प्रमाण वाढले होते. मात्र असे संदेश पाठवून समाजाचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात अवघा एकच गुन्हा दाखल करण्यात आला. यातूनच पोलीस प्रशासन किती ‘कार्यतत्पर’ आहे याची प्रचिती येत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत किती गुन्हे दाखल झाले, २०२० मध्ये सायबर क्राईमच्या गुन्ह्यांचे प्रमाण किती होते, ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘सोशल मीडिया’संदर्भातील किती गुन्हे नोंदविण्यात आले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, २५ मार्च ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘फेसबुक’, ‘टिकटॉक’ व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरप्रकार करणाऱ्यांवर पाच गुन्हे दाखल झाले, तर ‘कोरोना’च्या अफवा पसरविल्याबाबत तीनच गुन्हे दाखल झाले. विशेष म्हणजे ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘कोरोना’संदर्भात अनेक अफवा पसरविण्यात आल्या होत्या व मनपा प्रशासनानेदेखील कठोर पावले उचलण्यात येतील, असा इशारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आकडा फारच तोकडा ठरला.

‘सायबर क्राईम’ची संख्या ७५ टक्क्यांनी वाढीस

‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘सायबर क्राईम’ची संख्यादेखील वाढली. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात ‘सायबर क्राईम’संदर्भात एकूण १६६ गुन्हे दाखल झाले. दर महिन्याला सरासरी १८ गुन्हे नोंदविण्यात आले. २०१९ साली एकूण १२६ गुन्हे नोंदविण्यात आले होते व दर महिना सरासरी १० गुन्हे इतकी होती. सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता, यावर्षी २०१९ च्या तुलनेत ‘सायबर क्राईम’ची संख्या ७५ टक्क्यांनी वाढीस लागली.

एकूण गुन्ह्यात १८ टक्क्यांनी घट

२०१९ साली नागपूर पोलिसांनी एकूण ७ हजार ७३५ गुन्हे नोंदविले. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ४ हजार ७२० गुन्हे नोंदविले गेले. २०१९ मध्ये गुन्ह्यांची दर महिना सरासरी ६४४ इतकी होती, तर २०२० मध्ये हा आकडा ५२४ इतका होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत एकूण गुन्ह्यात १८.६४ टक्क्यांची घट दिसून आली.

‘सायबर क्राईम’चे गुन्हे

वर्ष- ऑनलाईन चिटिंग - क्रेडिट/डेबिट कार्ड फसवणूक- ऑनलाईन बँकिंग- ओटीपी फसवणूक-इतर

२०१९ - ११ - १४ -४-६ - ४७

२०२० (सप्टेंबरपर्यंत)- १३ -३- १२ -६- ४९

Web Title: Only one offense for an offensive ‘WhatsApp’ message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.