दुचाकीवर एक तर चार चाकीत तीघांनाच परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 01:20 AM2020-07-19T01:20:17+5:302020-07-19T01:22:27+5:30

शहरातील ऑटोरिक्षा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आवश्यक कामानिमित्त दुचाकीवर एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. तसेच कार किंवा इतर मोठ्या वाहनात चालक आणि अन्य दोन प्रवासी प्रवास करु शकेल.

Only one on two wheels and three on four wheels are allowed | दुचाकीवर एक तर चार चाकीत तीघांनाच परवानगी

दुचाकीवर एक तर चार चाकीत तीघांनाच परवानगी

Next
ठळक मुद्दे८१९ वाहनचालकांवर कारवाई : ऑटोरिक्षा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील ऑटोरिक्षा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आवश्यक कामानिमित्त दुचाकीवर एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. तसेच कार किंवा इतर मोठ्या वाहनात चालक आणि अन्य दोन प्रवासी प्रवास करु शकेल. त्यांच्या व्यतिरिक्त वाहनात प्रवासी आढळल्यास किंवा दुचाकीवर एकापेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी शनिवारी सकाळी या संबंधीचा आदेश जारी केला आहे. विविध उपाययोजना करूनही कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत असल्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पोलिसांनी आता वाहनचालकांवर लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहन चालकांना अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर फिरण्यास मुभा दिली. मात्र काही नियम आणि अटी घातल्या आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम शनिवारपासून सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, आज दिवसभरात एकूण ८१९ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Only one on two wheels and three on four wheels are allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.