नागपूर नागनदीवरील पूल लवकर खुला करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 09:24 PM2018-06-12T21:24:43+5:302018-06-12T21:25:29+5:30
गेल्या काही वर्षापासून मोक्षधाम घाट येथील नागनदीवरील पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या कामामुळे या मार्गावरील रहदारी विस्कळीत झाली असल्याने पुलाचे काम पूर्ण करून जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी पुलाची पाहणी केल्यानंतर दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही वर्षापासून मोक्षधाम घाट येथील नागनदीवरील पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या कामामुळे या मार्गावरील रहदारी विस्कळीत झाली असल्याने पुलाचे काम पूर्ण करून जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी पुलाची पाहणी केल्यानंतर दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते. मोक्षधाम पुलाच्या सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती मनोज तालेवार यांनी दिली. पुलाच्या कामाला आधीच बराच विलंब झाला आहे, आता उशीर नको व्हायला नको, उवंरित काम तातडीने पूर्ण करून हा पूल रहदारीसाठी खुला करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
यानंतर मान्यवरांनी इमामवाडा परिसराची पाहणी केली. मोक्षधाम पुलाकडून मेडिकल चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया जात आहे. यामुळे परिसरात चिखलही झाला आहे. फुटलेली पाईपलाईन तातडीने संबंधित अधिकाºयांकडून दुरुस्त करण्यास आयुक्तांनी सांगितले. स्थानिक व्यावसायिक संस्थानांनी आपल्या दुकांनासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
सहकार नगर नाल्याच्या पुलाची पाहणी.
सहकारनगर घाटानजीक असलेल्या नाल्यावरील असलेल्या पुलाची पाहणी आयुक्तांनी केली. शनिवारी व रविवारी आलेल्या पावसामुळे पुलालगत असलेली पाईपलाईन फुटली झाली होती. ती दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. पुढील पाच दिवसात काम पूर्ण करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. यापुढे असे प्रकार घडणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शोधून काढण्यास सांगितले.