सलामीच्या सामन्यालाच बुकिंची बल्ले बल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 09:57 AM2020-09-21T09:57:27+5:302020-09-21T09:57:48+5:30

आयपीएलच्या १३ व्या सिझनच्या पहिल्याच दिवशी बुकिंनी डाव साधला. सटोड्यांची दिशाभूल करीत त्यांच्याकडून मनासारखा लगवाडी करवून घेत बुकींनी ७०० ते ८०० करोड रुपयांची खयवाडी करून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

The opening match was a bookie's day | सलामीच्या सामन्यालाच बुकिंची बल्ले बल्ले

सलामीच्या सामन्यालाच बुकिंची बल्ले बल्ले

Next
ठळक मुद्दे७०० कोटींची खयवाडी

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयपीएलच्या १३ व्या सिझनच्या पहिल्याच दिवशी बुकिंनी डाव साधला. सटोड्यांची दिशाभूल करीत त्यांच्याकडून मनासारखा लगवाडी करवून घेत बुकींनी ७०० ते ८०० करोड रुपयांची खयवाडी करून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी मानली जाणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामान्यांना शनिवारी सुरुवात झाली. तत्पूर्वीच जगभरातील सट्टेबाज आयपीएलची तयारी करून बसले होते. मध्य भारतातील क्रिकेट सट्ट्याचे सर्वात मोठे सेंटर मानल्या जाणाऱ्या नागपुरातही बुकिंनी आपापल्या हस्तकामार्फत खयवाडी लगवाडीची व्यवस्था केली होती. ठरल्याप्रमाणे बुकिंनी सलामीच्या सामन्यापासूनच दिशाभूल करण्याचा डाव टाकला. पहिल्या सामन्याला मुंबई इंडियन्सला त्यांनी कमी भाव दिल्यामुळे सगळ्यांनी मुंबई इंडियन्सवर मोठ्या प्रमाणात रक्कम लावली. सामना सुरू झाल्यानंतर शेवटच्या शटकापर्यंत कलर (डाव) बदलत गेले, भाव बदलत गेले आणि बुकिंचे गल्लेही भरत गेले. मध्य भारतातून सलामीच्या सामन्यात ७००-८०० कोटींची उलाढाल झाल्याचे सांगितले जाते.

डिजिटल पेमेंटवर भर
यापूर्वीपर्यंत सटयाचा व्यवहार सहा दिवस उधारीत आणि सातव्या दिवशी लेण्यादेण्याचा असतो. मात्र यावेळी बुकिंनी आर्थिक मंदी लक्षात घेऊन डिजिटल पेमेंट वर भर दिल्याची बुकी वर्तुळातील माहिती आहे.

नागपूरच्या सीमेवरून फटकेबाजी
मध्य भारताचा सट्टाबाजार चालविणारे बुकी नागपुरात राहत असले तरी त्यांनी गेल्या दोन वर्षापासून सुरक्षेच्या कारणावरून भंडारा आणि बुटीबोरीकडे आपले बस्तान जमवले आहे. अर्थात नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरून ते खयवाडी करत आहेत.

खबरदार : सीपींचा इशारा
नुकतेच नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेले अमितेशकुमार १३ वर्षांपूर्वी येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी नागपुरात सुरू असलेल्या भारत आणि वेस्टइंडीज मधील क्रिकेट सामन्याची फिक्सिंग त्यांनी उघड केली होती. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा साथीदार मुकेश कोचर आणि वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू मरलोन सॅम्युअल यांच्यातील बातचीत टेप करून अमितेशकुमार यांनी जगभरात खळबळ उडवून दिली होती. येथील बुकिंचे भक्कम नेटवर्कही त्यांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे त्यांनी हे नेटवर्क खोदून काढण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. लोकमत'शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नागपुरातून क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या बुकिंनी आपले धंदे बंद करावे अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी लोकमतच्या माध्यमातून दिला आहे.

 

Web Title: The opening match was a bookie's day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.