आॅपरेशन मुस्कान

By admin | Published: January 12, 2016 03:13 AM2016-01-12T03:13:32+5:302016-01-12T03:13:32+5:30

जुलै २०१५ मध्ये नागपूरात राबविण्यात आलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मध्ये शहर पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीची दखल राज्य शासनाने घेतली आहे.

Operation Smile | आॅपरेशन मुस्कान

आॅपरेशन मुस्कान

Next

मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक
नागपूर : जुलै २०१५ मध्ये नागपूरात राबविण्यात आलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मध्ये शहर पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीची दखल राज्य शासनाने घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांचा सत्कार केला.
मिनिस्ट्री आॅफ होम अफेअर्स नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार हरविलेल्या मुलांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्रात १ जुलै ते ३१ जुलै २०१५ दरम्यान ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. उपराजधानीतही ही मोहीम राबवून महिनाभरात ३४ अल्पवयीन मुले, १०९ मुली, २१३ पुरुष आणि २५५ स्त्रिया असे एकूण ६११ बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात आले. शहरातील १४३ बालकांना ताब्यात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे ही बालके आता समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहात आली आहे. शहर पोलिसांच्या या बहुमोल कामगिरीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली.

पुण्यात सत्कार
त्यांनी पुणे येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील वरिष्ठ निरीक्षक बाजीराव पवार, एपीआय अमिता जयपूरकर, सुनीता पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, शहर पोलीस दलासह मुख्यालयातील २० अंमलदारांनी या मोहिमेत विशेष कामगिरी बजावली. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती.

Web Title: Operation Smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.