नेत्रचिकित्सा रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत नेत्र चिकित्सा शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:21+5:302021-02-11T04:10:21+5:30
कळमेश्वर: नागपूर जिल्हा वाहतूक शाखा आणि पोलीस स्टेशन कळमेश्वर तर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी वेगवेगळे ...
कळमेश्वर: नागपूर जिल्हा वाहतूक शाखा आणि पोलीस स्टेशन कळमेश्वर तर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नेत्र दोष असल्याने किंवा नजर कमी झाल्याने होणारे अपघात टाळता यावे म्हणून नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन नुकतेच कळमेश्वर -गोंडखैरी रस्त्यावरील औद्योगिक वसाहत चौकामध्ये करण्यात आले होते.
सदर शिबिराला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट दिली. या शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालयातील नेत्र रोग तज्ञ डॉ. राम लांबट व त्यांचे चमू ने सेवा दिली. याच शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालयातील एच.आय.व्ही विभागाच्या समुपदेशक अर्चना चंदनखेडे यांनी उपस्थित गाडी चालकांना एचआयव्ही बाबतचे समुपदेशन करून वाहन चालकाची तपासणी केली. शिबिराचे उद्घाटन कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख आणि जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक परगणे यांनी केले. सुरक्षित वाहन चालविण्यासाठी शरीर सुद्धा स्वस्थ लागेल व यासाठी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सांगीतले. सदर नेत्र चिकित्सा शिबिरात पोलीस कर्मचारी, ट्रक चालक, वाहतूक कर्मचारी अशा एकूण ३५ लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. चष्म्यांचे वाटप सुद्धा करण्यात आले. औषधे देण्यात आली. एच.आय.व्ही बाबत २५ लोकांची तपासणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कळमेश्वर वाहतूक शाखेतील हेड कॉन्स्टेबल शंकर पाल, पोलीस कॉन्स्टेबल विशाल बडदे, एनपीसी गजानन निंबेकर ,पोलीस कॉन्स्टेबल ललित उईके ,पवन वाघमारे, रवी मोहोड, जिल्हा वाहतूक शाखेचे हेडकॉन्स्टेबल बबन बहादुरे, एनपीसी मंगेश काळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण गडकन, प्रफुल बांगडे, सामाजिक कार्यकर्ते रोशन गजभिये,ओलासी कुंभरे, व वाहतूक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.