ओसीडब्ल्यूवर विरोधक आक्रमक

By Admin | Published: June 21, 2015 03:01 AM2015-06-21T03:01:08+5:302015-06-21T03:01:08+5:30

शहरातील नागरिकांना २४ तास तर दूरच २ तासही पाणी मिळत नाही. असे असतानाही महापालिकेने आॅरेंजसिटी वॉटर वर्क्स (ओसीडब्ल्यू)ला २६ कोटी जादा दिले आहे.

Opponent aggressive on ocw | ओसीडब्ल्यूवर विरोधक आक्रमक

ओसीडब्ल्यूवर विरोधक आक्रमक

googlenewsNext

नागपूर : शहरातील नागरिकांना २४ तास तर दूरच २ तासही पाणी मिळत नाही. असे असतानाही महापालिकेने आॅरेंजसिटी वॉटर वर्क्स (ओसीडब्ल्यू)ला २६ कोटी जादा दिले आहे. लेखा परीक्षकांच्या अहवालात हा ठपका ठेवण्यात आल्याच्या मुद्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक भूिमका घेत ओसीडब्ल्यूला हटवा नाही तर महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत सभागृहात जोरदार नारेबाजी केली. वेलमध्ये येऊन महापौर प्रवीण दटके यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. गोंधळामुळे दोनवेळा सभेचे कामकाज तहकूब करावे लागले; नंतर गोंधळताच विषय मंजूर करून सभेचे कामकाज संपविण्यात आले.
प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी ओसीडब्ल्यूचा मुद्दा उपस्थित केला होता. मनपाने कंपनीला १८७.८९ एमएलडी पाण्याच्या बिलापोटी २५० एमलएलडीचे बिल दिले. वीज बिल भरण्याची जबाबदारी कंपनीची असताना मनपाच्या तिजोरीतून खर्च होत आहे. कंपनीसोबत करण्यात आलेला करारच चुकीचा असल्याचे ताशेरे लेखा परीक्षकांनी अहवालात ओढले आहे. त्यामुळे हा अहवाल चुकीचा की मनपा, हे स्पष्ट करावे; नाही तर प्रशासन सभागृहात उत्तर देण्यास सक्षम नसल्याचे सांगावे, अशी आक्रमक भूमिका ठाकरे यांनी मांडली.
परीक्षणात जादाची रक्कम देण्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासनाने स्पष्टीकरण पाठविले आहे. अहवाल चुकीचे की योग्य, असे सांगता येणार नाही. मात्र हा अहवाल मनपाला अमान्य असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उत्तरात सांगितले. तर जे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत त्यावर स्पष्टीकरण पाठविण्यात आल्याची माहिती दटके यांनी दिली. या उत्तराने विरोधी सदस्यांचे समाधान न झाल्याने ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी ओसीडब्ल्यूविरोधात नारेबाजी सुरू केली. गोंधळामुळे दोनवेळा कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ न शमल्याने गोंधळात विषय मंजूर करून सभा गुंडाळण्याचा क्रम महापौर प्रवीण दटके यांनी कायम ठेवला. (प्रतिनिधी)

Web Title: Opponent aggressive on ocw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.