भावी अस्थिरोगतज्ज्ञांना लंडनमध्ये संधी: दीपक हर्लेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:47 AM2018-11-24T01:47:38+5:302018-11-24T01:48:19+5:30
पाश्चात्त्य देशात भारतीय वैद्यकीय चिकित्सकांना मानाचे स्थान आहे. यामुळे लंडनसारख्या देशात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संधी आहेत. त्या दृष्टीनेही अस्थिव्यंग शल्यचिकित्सकांनी विचार करावा, असे आवाहन नागपूरकर असलेले व गेल्या १८ वर्षांपासून लंडन येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. दीपक हर्लेकर यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाश्चात्त्य देशात भारतीय वैद्यकीय चिकित्सकांना मानाचे स्थान आहे. यामुळे लंडनसारख्या देशात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संधी आहेत. त्या दृष्टीनेही अस्थिव्यंग शल्यचिकित्सकांनी विचार करावा, असे आवाहन नागपूरकर असलेले व गेल्या १८ वर्षांपासून लंडन येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. दीपक हर्लेकर यांनी येथे केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अस्थिव्यंगरोग विभागाच्यावतीने आयोजित एकदिवसीय ‘सांधे प्रत्यारोपण’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, विभाग प्रमुख डॉ. सजल मित्रा, डॉ. उन्मेश महाजन, डॉ. अमोल कडू, डॉ. एम. फैझल, डॉ. देवाशिष बॅरिक, डॉ. मनोज पहुकर उपस्थित होते.
डॉ. हर्लेकर म्हणाले, लंडनध्ये प्रत्येक डॉक्टरचेही आॅडिट होते. राजघराण्यातील व्यक्तीपासून ते सर्वसामान्य मजुरालादेखील सारखा उपचार मिळतो. तिथे मोफत उपचार प्रणाली आहे. रुग्णहिताला केंद्रस्थानी ठेवून सर्वांना समान एक देश एक उपचारपद्धतीच्या आधारावर ही व्यवस्था सक्षम करण्यात आली आहे. डॉक्टरच्या सेवेचेही पारदर्शीपणे आॅडिट होते. जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणा ऱ्यांना अस्थिरोगाशी निगडित अद्ययावत तंत्राचे ज्ञान व्हावे, यासाठी ‘लर्न, अर्न अॅन्ड रिटर्न’ या त्रिसूत्रीनुसार प्रात्यक्षिकांवर आधारित तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते, असेही ते म्हणाले.
सिकलसेलग्रस्तांना मदत होईल-डॉ. मित्रा
डॉ. सजल मित्रा म्हणाले, लंडनमधील अद्ययावत तंत्रज्ञान आणि येथील डॉक्टरांचे अनुभवाची सांगड घालता आली तरी सिकलसेलग्रस्तांना मदत होईल. विदर्भात सिकलसेलग्रस्तांची संख्या मोठी आहे. यात अनेकांना ‘हिप जॉर्इंट रिप्लेसमेंट’ची गरज पडते, असेही ते म्हणाले.