ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २६ महिलांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:36 AM2020-12-17T04:36:01+5:302020-12-17T04:36:01+5:30
कळमेश्वर: येत्या १५ जानेवारीला तालुक्यातील होऊ घातलेल्या ५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ४७ सदस्यांपैकी २६ महिलांना संधी मिळणार आहे. निवडणूक ...
कळमेश्वर: येत्या १५ जानेवारीला तालुक्यातील होऊ घातलेल्या ५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ४७ सदस्यांपैकी २६ महिलांना संधी मिळणार आहे. निवडणूक तोंडावर असताना तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुका होत असलेल्या ५ ग्रामपंचायतीमध्ये कोहळी (मोहळी), सोनेगाव (पोही), सेलू (गुमथळा), सावंगी (तोमर), सोनपूर (आदासा) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायती मधून ४७ सदस्य निवडून येणार आहेत. त्यात २६ महिला सदस्य राहणार आहेत. यात सर्वसाधारण प्रवर्गातून १५, नागरिकांचा मागास प्रवर्गातून ६, अनुसूचित जाती प्रवर्गातून ५ महिला सदस्यांचा समावेश आहे. यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर पुरुष सदस्यापेक्षा महिला सदस्यांची संख्या ही किमान एकने अधिक राहणार आहे. त्यामुळे २१ पुरुषांनाच यावेळी ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान मिळणार आहे. यात काही प्रस्थापित तर काही नवे चेहरे राहतील. पाचही ग्रामपंचायतीचे एकूण १६ वाॅर्डात विभाजन करण्यात आले आहे. यात एकूण ९ हजार ७६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात ४७३७ महिला मतदार तर ५०२४ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
अशा आहेत ग्रा.पं.
कोहळी (मोहळी)
वाॅर्ड संख्या -४
महिला मतदार- १५९९
पुरुष मतदार - १६४७
एकूण मतदार - ३२४६
सदस्य संख्या - ११
-----
सोनेगाव (पोही)
वाॅर्ड संख्या- ३
महिला मतदार -९२९
पुरुष मतदार - १०१५
एकूण मतदार- १९४४
सदस्य संख्या- ९
----
सेलू (गुमथळा)
वाॅर्ड संख्या - ३
महिला मतदार - ७४९
पुरुष मतदार- ७६२
एकूण मतदार- १५११
सदस्य संख्या - ९
---
सावंगी (तोमर)
वाॅर्ड संख्या ३
स्त्री मतदार ८२०
पुरुष मतदार ८५९
एकूण मतदार १६७९
सदस्य संख्या ९
----
सोनपूर (आदासा)
वाॅर्ड संख्या- ३
महिला मतदार -६३९
पुरुष मतदार -७४१
एकूण मतदार- १३८०
सदस्य संख्या ९